अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या अडचणीत वाढ, मावळमधील शेतकऱ्याची थेट न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?
Sonali Bendre : सोनाली बेंद्रे यांचे वकील राजू शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. फिर्यादी शेतकरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि पैसे उकळण्याच्या उद्देशाने सोनाली बेंद्रे व गोल्डी बेहल यांची बदनामी करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या अडचणीत वाढ
मावळमधील शेतकऱ्याची थेट न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?
Sonali Bendre : मावळ तालुक्यातील उकसान येथील शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत. स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करत संबंधित जमीन वडिलोपार्जित कुळ हक्काची असल्याचा दावा केला आहे.
संपूर्ण प्रकरण नेमकं काय?
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, कुळकायद्यानुसार 1957 पूर्वीपासून ताब्यात असलेल्या 30 गुंठे जमिनीवर त्यांचा हक्क आहे. मात्र, खोट्या कागदपत्रांच्या आधारे हा हक्क डावलून ती जमीन सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांनी खरेदी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, संबंधित जागेवर बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.
जमीन पाहणीदरम्यान शिंदे कुटुंबीयांना दमदाटी केल्याचा आरोप
फिर्यादी पक्षाचे वकील वनराज शिंदे यांनी आरोप केला की, जमीन पाहणीदरम्यान शिंदे कुटुंबीयांना दमदाटी करण्यात आली. या प्रकरणी यापूर्वी पोलिसांत तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.









