कामासाठी नेपाळवरुन आली अल्पवयीन मुलं, पण कामाच्या ठिकाणी झाले लैंगिक अत्याचार; गुजरातमध्ये घडलं भयानक

मुंबई तक

नेपाळवरुन कामासाठी गुजरातमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलांसबोत भयानक प्रकार घडला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राजकोट येथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

ADVERTISEMENT

Gujrat Crime
Gujrat Crime
google news

बातम्या हायलाइट

point

कामासाठी नेपाळवरुन आली अल्पवयीन मुलं

point

पण कामाच्या ठिकाणी झाले लैंगिक अत्याचार

point

गुजरातमध्ये घडलं भयानक

Gujrat Crime : गुजरातमधील राजकोट येथील एका शाळेच्या निवासी इमारतीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सोशल मीडियावर अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे घृणास्पद कृत्य समोर आले. जयेश मजेठिया आणि संदीप ऊर्फ लाला पटेल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, गेल्या तीन महिन्यांपासून हा छळ सुरू असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

पीडित मुले मूळ नेपाळची

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुले मूळची नेपाळची असून त्यांचे वय 14 आणि 16 वर्षे आहे. याप्रकरणी एका पीडिताच्या आजीने  याप्रकरणी 'ए डिव्हिजन' पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही महिला राजकोटमध्ये घरकाम करते. पाण्याचे पिंप धुण्याच्या कामासाठी या मुलांना नेण्यात आले होते, तिथेच त्यांचा आरोपींशी संपर्क आला. या संधीचा फायदा घेत आरोपींनी निवासी इमारतीत मुलांवर वारंवार अत्याचार केले.

हे ही वाचा : कल्याण : कामावरुन काढण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल, केडीएमसीतील लिपिकाकडून कर्मचारी महिलेकडे शरीरसुखाची मागणी

जीवे मारण्याची धमकी

तक्रारीनुसार, आरोपींनी केवळ अत्याचारच केला नाही, तर मुलांनी विरोध केला असता त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या छळाचे व्हिडिओ आरोपींनी स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रित केले होते, जे नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले. या गंभीर प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : अकोला : 'तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव..' महिला आरोपीकडे पोलिसाची आक्षेपार्ह मागणी; व्हिडिओ व्हायरल

अत्यंत गांभीर्याने तपास सुरु

पीडित मुलांकडे वयाचा कोणताही अधिकृत दाखला नसल्यामुळे, पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय अहवालात पीडितांचे वय अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी कलम 351 आणि 54(2) अंतर्गत कारवाई करत दोन्ही आरोपींना कोठडीत घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत गांभीर्याने केला जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे वाचलं का?