बीड: मध्यस्थी करायला गेला शेजारी अन् भलतंच होऊन बसलं...

मुंबई तक

Beed Crime News: केज तालुक्यात विहिरीच्या वादातून नातेवाईकांमध्येच झालेल्या भांडणात शेजारी मध्यस्थी करायला गेलेला असताना त्याच्याच पोटात चाकू खुपसल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

beed crime news neighbor stabbed for mediating in a dispute between relatives
Beed Crime News
google news

रोहिदास हातागळे, बीड: केज तालुक्यातील शिरूरघाट येथे विहिरीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाने सोमवारी (30 मार्च) सकाळी रक्तरंजित वळण घेतले. वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सुंदर सांगळे यांच्या पोटात आरोपीने चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेत अन्य तिघेही काठीच्या मारहाणीत जखमी झाले असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शिरूरघाट येथील रहिवासी राजेंद्र उर्फ राजाभाऊ सुभाष सांगळे आणि त्याचे चुलते भीमराव रामभाऊ सांगळे यांच्यात शेतातील विहिरीच्या हिश्श्यावरून जुना वाद सुरू आहे. सोमवारी सकाळी १०:३० च्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. आरोपी राजेंद्र सांगळे याने त्याचे चुलते भीमराव यांना शिवीगाळ करत काठीने डोक्यात मारहाण करण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा>> 'बायको म्हणते प्रचंड शारीरिक संबंध कर', नवरा वैतागला अन् थेट...

भीमराव यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा मोहन सांगळे आणि भाऊ अर्जुन सांगळे धावून आले असता, आरोपीने त्यांनाही काठीने बेदम मारहाण केली. यावेळी शेजारी राहणारे सुंदर धनराज सांगळे हे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेले. मात्र, संतापलेल्या आरोपीने "तुझा काय संबंध?" असे म्हणत कमरेला असलेला चाकू काढून थेट सुंदर सांगळे यांच्या पोटात खुपसला. 

या भीषण हल्ल्यात सुंदर सांगळे हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. घटनेनंतर आरोपी राजेंद्र सांगळे घटनास्थळावरून फरार झाला. नातेवाईकांनी तातडीने जखमींना खाजगी वाहनाने बीड येथील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. सुंदर सांगळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

हे वाचलं का?