'बायको म्हणते प्रचंड शारीरिक संबंध कर', नवरा वैतागला अन् थेट...

मुंबई तक

Crime News : पतीने स्वत:च्या पत्नीवर आरोप केले की, पत्नी त्याला अधिकरित्या लैंगिक संबंधासाठी जबरदस्ती करते. नंतर नकार दिल्यास महिला पतीचा मानसिक छळ करू लागते. हे प्रकरण केवळ कौटुंबिक वादापुरतेच मर्यादीत नसून समाजाने उघडपणे चर्चा करणे टाळलेल्या प्रकारणावर प्रकाश टाकते.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नी आणि सासू आपला छळ आणि अपमान करत असल्याचा आरोप

point

पत्नी वारंवार लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्याचा आरोप

Crime News : बंगळुरुत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने स्वत:च्या पत्नीवर आरोप केले की, पत्नी त्याला अधिकरित्या लैंगिक संबंधासाठी जबरदस्ती करते. नंतर नकार दिल्यास महिला पतीचा मानसिक छळ करू लागते. हे प्रकरण कौटुंबिक वादाचे आहे. बंगळुरूमधील अमृतहळ्ळी परिसरात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमुळेच आता या प्रकरणाबाबत प्रश्न निर्माण होऊ लागलेत. 

हे ही वाचा : 40 वर्षीय महिलेची 28 वर्षीय तरुणाशी इंस्टाग्रामवर ओळख, चार मुलं सोडून पत्नी बॉयफ्रेंडसोबत गेली पळून

पत्नी आणि सासू आपला छळ आणि अपमान करत असल्याचा आरोप

संबंधित प्रकरणात पतीने दावा केला की, लग्नापासून पत्नीचे वागणे अगदीच असामान्य राहिले आहे, नंतर काळानुसार परिस्थिती अगदीच बिघडली असता, पत्नी आणि सासू आपला छळ आणि अपमान करत असल्याचा आरोप त्याने केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. 

पत्नी वारंवार लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्याचा आरोप

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, पत्नी त्याला वारंवार लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असल्याचा आरोप आहे. जेव्हा त्याने नकार दिला असता, त्याला मानसिक छळाला समोरे जावे लागले. संबंधित प्रकरणात असा आरोप की, पत्नी त्याला तिच्या मैत्रिणीजवळ जवळीक साधण्यास भाग पाडले गेले होते, ज्यामुळे पतीला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला होता. 

हे ही वाचा : तरुणाची नोकरी गमावली, पुण्यातल्या एफसी रोड परिसरात स्वत:चा गळा चिरला अन्...

या प्रकरणात पतीने आपल्या सासूवर गंभीर आरोप केला. त्याचे म्हणणे असे की, सासूच पत्नीला चिथावत असत आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात नाक खुपसण्याचा प्रयत्न करत होती. तिने आर्थिक परिस्थितीवरून त्याचा अपमान केला आणि मुलीला त्याच्यापासून वेगळे होण्याचा आग्रह धरला होता. 

हे वाचलं का?