नागपूर : तरुणाने तरुणीचे केले लैंगिक शोषण, ब्लॅकमेल करत केला विवाह आणि गोमांस खाण्यास दबाव...
Nagpur crime : तरुणाने ब्लॅकमेल करत तरुणीवर लैंगिक अत्याचार केला, नंतर लग्नासाठी दबाव आणला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पीडितेवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार
व्हिडिओद्वारे पीडितेला ब्लॅकमेल केलं
Nagpur Crime : आधी तरुणीशी मैत्री केली, मग अत्याचार करत व्हिडिओ बनवले, त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत मुस्लिम रितीरिवाजानुसार तिच्याशी निकाह केला. इतकंच नाही तर तिच्यावर जबरदस्ती करत गोमांसही खाऊ घातल्याचा आरोप आहे. राज्यात वारंवार लव्ह जिहादचा मुद्दा तापत असताना नागपुरात ही धक्कादायक घटना घडलीय. पीडित महिलेने 'लव्ह जिहाद' प्रकरणात पाच जणांविरुद्ध एफआरआय दाखल केलीय.
हे ही वाचा : विम्याच्या पैशांसाठी भावानेच भावावर दगडाने हल्ला करत संपवलं, नंतर दुचाकीवरून दिलं फेकून पुढे...
पीडितेवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार
घडलं असं की, 21 वर्षीय तरुणीला 5 नोव्हेंबर 2025 रोजी तिचा शालेय मित्र मुस्ताक शकील अन्सारी याने एका मंदिराजवळ बोलावलं. त्यानंतर तो तिला त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेदरम्यान, आरोपी राजा शेख आणि त्याच्या दोन साथीदारांनी या कृत्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा पीडितेचा आरोप आहे.
हे ही वाचा : Astrology : काही राशीतील लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहिल, तर 'या' लोकांना सरप्राइज मिळण्याची शक्यता
व्हिडिओद्वारे पीडितेला ब्लॅकमेल केलं
त्यानंतर त्याच व्हिडिओद्वारे तिला ब्लॅकमेल करत तिला लग्नासाठी भाग पाडलं. इतकच नाही, तर आरोपींनी अंधश्रद्धेचा आधार घेऊन पीडितेवर जादूटोणाही केला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केलीय. यासंदर्भात नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सतीश आडे यांनी अधिक माहिती दिलीय.









