अकोला : 'तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव..' महिला आरोपीकडे पोलिसाची आक्षेपार्ह मागणी; व्हिडिओ व्हायरल

मुंबई तक

अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका सहायक पोलिस उपनिरिक्षकाने अटकेत असलेल्या महिलेकडे आक्षेपार्ह मागणी केली. याप्रकरणी पोलिस अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

Akola Crime
Akola Crime
google news

बातम्या हायलाइट

point

अकोला : 'तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव..

point

महिला आरोपीकडे पोलिसाची आक्षेपार्ह मागणी

point

व्हिडिओ व्हायरल

Akola Crime, धनंजय साबळे : 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य असणाऱ्या पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का देणारी एक बातमी समोर आली आहे. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये असलेल्या एका महिला आरोपीकडे, कर्तव्यावर तैनात असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआई) राजेश जाधव याने तिच्या मुलीला 'शारीरिक सुखासाठी' पाठवण्याची धक्कादायक मागणी केली. या संतापजनक प्रकारामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून, आरोपी एएसआयला तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

पदाचा गैरवापर करत आक्षेपार्ह मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, 80 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात संबंधित महिलेला अटक करून सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. यादरम्यान एएसआय राजेश जाधव याने पदाचा गैरवापर करत महिलेला पैशांचे आमिष दाखवले आणि तिच्या मुलीबद्दल अत्यंत आक्षेपार्ह मागणी केली. पीडित महिलेने या प्रकाराची तक्रार वरिष्ठांकडे केल्यानंतर पोलीस विभागात खळबळ माजली.

हे ही वाचा : अरे बापरे.. पुणेकरांनो, तुमच्या पुण्याचं अचानक कसं झालं काश्मीर? सगळा झांगडगुत्ताच!

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फटकारले

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी आरोपी एएसआयची कडक शब्दांत कानउघडणी करताना दिसत आहेत. 'वर्दी घातली आहेस ना तू... असे कृत्य करताना तुला लाज वाटली नाही का?' अशा शब्दांत वरिष्ठांनी त्याला फटकारले. संतापलेल्या अधिकाऱ्याने आरोपीला मारण्याचा प्रयत्नही केला, मात्र वर्दीची मर्यादा राखून स्वत:ला रोखले. सध्या राजेश जाधव विरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी अद्याप त्याला अटक झालेली नाही.

हे ही वाचा : 'त्या' गोळ्या अन् Inside Story, अशोक खरात अश्लील चाळे करण्याआधी महिलांना द्यायचा 'त्या' गोळ्या?

कठोर कारवाईची मागणी

रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी जर महिलांना अशा अश्लील मागण्यांचा सामना करावा लागत असेल, तर सामान्य जनतेने कोणाकडे पाहायचे, असा सवाल उपस्थित होत आहे. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असून, आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
 

हे वाचलं का?