अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यातही सहभाग, खरातच्या शिक्षक भावाला मिळाला 'खास' लाभ; केसरकरांचा पाय खोलात
भोंदू अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यातही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री असताना खराच्या भावाला शालार्थ आयडी मिळाल्याचे सांगितले जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यातही सहभाग
खरातच्या शिक्षक भावाला मिळाला 'खास' लाभ
केसरकरांचा पाय खोलात
Ashok Kharat News, प्रवीण ठाकरे : राज्यात सुरू असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात 850 पेक्षा अधिक शिक्षकांसह शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. या घोटाळ्यात भोंदूबाबा खरात याचाही मोठा सहभाग समोर आला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि अशोक खरात यांच्या घनिष्ट संबंधांवर आणि खरातच्या भावाला मिळालेला 'शालार्थ आयडी' यावर आता संशय उपस्थित होत आहे.
दीपक केसरकर शिक्षणमंत्री झाल्यानंतर
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर या दोघांमधील कनेक्शनवर सुषमा अंधारे यांनी फोटोसह गंभीर आरोप केले होते, अशोक खरातचा भाऊ दिलीप खरात हा सिन्नर तालुक्यातील बारागांव पिंपरी येथील शाळेत शिक्षक आहे. विशेष म्हणजे, 2022 मध्ये जेव्हा दीपक केसरकर शिक्षणमंत्री झाले, त्याच काळात दिलीप खरात यांना 'शालार्थ आयडी' बहाल करण्यात आला. कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट मंत्रालयातून हे काम झाल्याने शिक्षण क्षेत्रात चर्चांना उधाण आलंय.
2009 पासून विनाअनुदान तत्वावर कार्यरत दिलीप खरात यांना अचानक आयडी मिळाल्याने त्यांच्याच शाळेतील अनेक ज्येष्ठ शिक्षक नाराज झाले. ज्यांनी वर्षानुवर्षे प्रतीक्षा केली, त्यांना डावलून खरातच्या भावाला प्राथमिकता मिळाल्याने काही शिक्षकांनी वेतन पथकासमोर आंदोलनही केलं. मात्र, हे प्रकरण तापू नये म्हणून भोंदूबाबा अशोक खरातने ओळख वापरून इतर काही शिक्षकांच्या फाईल्सही मार्गी लावल्याची माहिती आहे.
हे ही वाचा : कल्याण : 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतुसे, तलवार आणि चॉपर्स.. 'या' प्रसिद्ध रीलस्टारच्या घरात सापडला अवैध शस्त्रसाठा
भोंदू खरातच्या भावाला मिळाला आयडी
शिक्षण विभागाकडे चौकशी केली असता दिलीप खरात हे विनाअनुदानित तत्वावर माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात काम करत होते, नंतर त्या कनिष्ठ महाविद्यालयाला 20 % अनुदान सुरू झाले. त्याच दरम्यान दिलीप खरात यास शालार्थ आयडी मिळाला. नंतर 40% तर आता 60% अनुदान या संस्थेला आहे. शैक्षणिक संस्थेने मात्र सेवाज्येष्ठता डावलून खरात यांस आयडी दिला असल्याची माहिती आहे.









