अरे बापरे.. पुणेकरांनो, तुमच्या पुण्याचं अचानक कसं झालं काश्मीर? सगळा झांगडगुत्ताच!

मुंबई तक

Pune Hailstorm: पुण्यात गारपीट आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये झालेल्या पावसामुळे हवामानात अचानक बदल झाला आहे. दिल्लीसह उत्तर भारतात सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला असून, हवामान तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

ADVERTISEMENT

pune weather, pune heavy hailfall,  sudden rain, heavy rain, Maharashtra, hailstorm, Pune, weather alert, orange alert, northern India,
Pune Rain
google news

Pune Weather and Hailstorm: पुणे: सोमवारी (30 मार्च) अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि गारपिटीमुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता आणि खालच्या वातावरणातील अस्थिरता ही या अनपेक्षित बदलामागची मुख्य कारणे आहेत. पाऊस आणि गारपिटीमुळे तापमानात अचानक घट झाली, ज्यामुळे कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला. पण त्यामुळे पुण्यात जी गारपीट झाली त्याने काही काळ पुणेकरांना पुणे जणू काही काश्मीरच आहे असंच भासू लागलेलं.

तज्ज्ञांच्या मते, पश्चिम भारतातील बदलती वातावरणीय परिस्थिती आणि आर्द्रतेचा प्रवाह या हवामानातील अस्थिरतेसाठी जबाबदार आहेत. पुणे आणि आसपासच्या पश्चिम घाटात ढगाळ वातावरण असून, दिवसभर तुरळक पावसाची शक्यता आहे. जेव्हा मेघगर्जनेच्या ढगांमधील जोरदार वाऱ्यामुळे पावसाचे थेंब वरच्या, थंड थरांमध्ये वाहून नेले जातात, तेव्हा ते घट्ट होऊन गारपिटीच्या रूपात पडतात. ही प्रक्रिया विशेषतः मान्सूनपूर्व हंगामात दिसून येते.

हे ही वाचा>> पुण्यात अवकाळी पावसाचा हाहाकार, गारांमुळे 'या' भागाला शिमल्याचं स्वरुप, Video व्हायरल

राज्यात नेमकं कसं असेल हवामान?

येत्या काही दिवसांत राज्यभरात पावसाची तीव्रता हळूहळू वाढण्याची शक्यता असून, मुंबईसह इतर शहरांमध्येही आठवड्याच्या मध्यापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेमुळे पाणी साचण्याचा आणि वाहतुकीत अडथळा येण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा>> पुण्याची गोष्ट : पुण्यातील हवाई प्रवाशांसाठी मोठी अपडेट, 'या' शहरांना थेट कनेक्टिव्हीटी

हवामान तज्ज्ञांच्या मते, देशाच्या विविध भागांमध्ये एकाच वेळी अनेक हवामान प्रणाली सक्रिय झाल्यामुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रहिवाशांना हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष देण्याचा आणि वादळाच्या वेळी आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे वाचलं का?