बीड : केज तालुक्यात विहिरीच्या वादातून थरार; मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीच्या पोटात सुरा खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न

मुंबई तक

Beed crime : केज तालुक्यातील शिरुरघाट येथे विहिरीच्या वाटणीवरून सुरु असलेल्या कौटुंबिक वादातून सोमवार ता. 30 मार्च 2026 रोजी सकाळी रक्तरंजित वळण घेतले. वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सुंदर सांगळे नावाच्या तरुणाच्या पोटात आरोपीने चाकूने सपावर वार केले.

ADVERTISEMENT

Beed crime 
Beed crime 
google news

बातम्या हायलाइट

point

विहिरीच्या हिश्श्यावरून जुना वाद

point

वाद मिटवण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या व्यक्तीच्या पोटात वार 

Beed Crime : रोहिदास हातागळे -  केज तालुक्यातील शिरुरघाट येथे विहिरीच्या वाटणीवरून सुरु असलेल्या कौटुंबिक वादातून सोमवार ता. 30 मार्च 2026 रोजी सकाळी रक्तरंजित वळण घेतले. वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या सुंदर सांगळे नावाच्या तरुणाच्या पोटात आरोपीने चाकूने सपावर वार केले. या घटनेत अन्य तिघेही मारहाण जखमी झाले असून, परिसरात एकच खळबळ माजली. 

हे ही वाचा : कल्याण : 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतुसे, तलवार आणि चॉपर्स.. 'या' प्रसिद्ध रीलस्टारच्या घरात सापडला अवैध शस्त्रसाठा

विहिरीच्या हिश्श्यावरून जुना वाद

घडलेल्या घटनेनुसार, शिरुरघाट परिसरातील रहिवासी असलेला राजेंद्र उर्फ राजाभाऊ सुभाष सांगळे आणि त्याचे चुलते भीमराव रामभाऊ सांगळे यांच्यातील शेतातील विहिरीच्या हिश्श्यावरून जुना वाद सुरु होता. त्यानंतर सोमवारी 30 मार्च रोजी सकाळी 10:30 च्या सुमारास हा वाद पुन्हा समोर आला. आरोपी राजेंद्र सांगळे याने चुलते भीमराव यांना शिवीगाळ केली आणि काठीने डोक्यात हल्ला केला. 

वाद मिटवण्यासाठी मध्यस्ती करणाऱ्या व्यक्तीच्या पोटात वार 

याचदरम्यान शेजारी राहणारे सुंदर धनराज सांगळे हे वाद मिटवण्यासाठी मध्यस्ती आले. याचवेळी संतापलेल्या आरोपीने तुझा यात संबंध काय?  असा प्रश्न करत जाब विचारला आणि चाकूने त्याच्या पोटावर वार केले. या भीषण हल्ल्यात सुंदर सांगळे हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. संबंधित घटनेनंतर आरोपी राजेंद्र सांगळे हे गंभीर जखमी झाले. 

हे ही वाचा : 8 वीत शिकणाऱ्या मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री, शाळेतून हॉटेलवर नेलं, दुसऱ्याच मुलीचं ओळखपत्र दाखवून लैंगिक शोषण

घटनेदरम्यान, पीजिताला तातडीने नातेवाईकांनी विवेकानंद खासगी रुग्णालयात दाखल केले. सुंदर सांगळे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. याप्रकरणी जखमींचे पुत्र बालाजी सांगळे यांनी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी राजेंद्र सांगळे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. 

हे वाचलं का?