8 वीत शिकणाऱ्या मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री, शाळेतून हॉटेलवर नेलं, दुसऱ्याच मुलीचं ओळखपत्र दाखवून लैंगिक शोषण

योगेश पांडे

Nagpur crime : इंस्टाग्रामवर मैत्री करून एका तरुणाने इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. तरुणाने मुलीला शाळेतून पळवून हॉटेलवर नेलं आणि तिच्यावर शरीरसंबंध ठेवले. पीडित मुलीचे वय वर्षे हे 13 असल्याची माहिती समोर आली.

ADVERTISEMENT

Nagpur crime
Nagpur crime
google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेलवर आरोपी करण केशव केसी पीडितेला घेऊन जायचा अन्...

point

दुसऱ्याच मुलीचे ओळखपत्र दाखवून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं

Nagpur Crime : इंस्टाग्रामवर मैत्री करून एका तरुणाने इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. तरुणाने मुलीला शाळेतून पळवून हॉटेलवर नेलं आणि तिच्यावर शरीरसंबंध ठेवले. हे प्रकरण नागपूर येथील आहे. पीडित मुलीचं वय 13 वर्षे आहे, तसेच आरोपी तरुणाचं नाव करण असे आहे. 

हे ही वाचा : कल्याण : 7 पिस्तूल, 370 जिवंत काडतुसे, तलवार आणि चॉपर्स.. 'या' प्रसिद्ध रीलस्टारच्या घरात सापडला अवैध शस्त्रसाठा

हॉटेलवर आरोपी करण केशव केसी पीडितेला घेऊन जायचा अन्...

वास्तविक पाहता, ही संपूर्ण घटना नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. तरुणाने पीडितेला ज्या हॉटेलवर नेलं होतं त्या हॉटेलचं नाव सिल्व्हर सुट्स हॉटेल असे आहे. याच हॉटेलवर आरोपी करण केशव केसी पीडितेला घेऊन जायचा. करण आणि पीडित मुलगी यांची पहिली भेट इंस्टाग्रामवर झाली होती आणि नंतर मैत्री निर्माण झाली. करणने कपाटाचा वापर करून मुलीला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला आपल्यासोबत येण्यास सांगितले. 

दुसऱ्याच मुलीचे ओळखपत्र दाखवून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलं

18 मार्च रोजी तरुण मुलीच्या शाळेजवळ आला; शाळेत न जाता आपल्यासोबत यावे, अशी सूचना त्याने त्या मुलीला आधीच देऊन ठेवली होती. पर्वनियोजित योजनेनुसार, करणने सकाळी 7:00 वाजता मुलीच्या शाळेसमोरून तिला आपल्या दुचाकीवर बसवून घेतले आणि एका सार्वजनिक स्वच्छता गृहापाशी नेले. तिथे त्या मुलीने गणवेश बदलला, नंतर तिला त्या हॉटेलमध्ये नेले. मुलगी अल्पवयीन होती हे नराधमाला ठाऊक होते, त्याने दुसऱ्याच मुलीचे ओळखपत्र सोबत ठेवले आणि हॉटेलमध्ये रुम मिळवण्यात यश मिळवले. नंतर तिचे लैंगिक शोषण केले, 27 मार्च रोजी पुन्हा त्याने असेच हैवानी कृत्य केले. 

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांत कोसळणार गारांचा पाऊस, पुढील काही तास महत्त्वाचे

करणच्या अशा हैवानी कृत्याला पीडित मुलगी बळी पडल्याने काही दिवसानंतर तिनं शाळेत जाणं बंद केलं. मुलगी शाळेत येत नसल्याची माहिती तिच्या आईला देण्यात आली, त्यानंतरच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या आईने पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आणि करणला अटक करण्यात आली. 

हे वाचलं का?