'त्या' गोळ्या अन् Inside Story, अशोक खरात अश्लील चाळे करण्याआधी महिलांना द्यायचा 'त्या' गोळ्या?
अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करण्यापूर्वी त्यांना काही विशिष्ट गोळ्या द्यायचा अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. जाणून घ्या याच घटनेची इनसाइड स्टोरी.
ADVERTISEMENT

प्रविण ठाकरे, नाशिक: महिला लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अशोक खरातच्या तपासात दररोज काही ना काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता या गुन्ह्यात नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात देखील मोठी खळबळ उडाली आहे. 29 तारखेला अशोक खरातच्या रिमांडसाठी मागणी करताना नाशिक कोर्टात SIT ने उल्लेख केला होता की महिलांना गुंगीचे औषध दिले जायचे. सोबत ओश्नोजलसह अन्य काही वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड गोष्टींचा संबंध आणि उल्लेखही या प्रकरणात आढळून आले आहेत. त्याचमुळं आता तीन डॉक्टर आणि काही मेडिकल्स तसेच लॅब्सची चौकशी होऊ शकते.
नेमकं काय-काय करायचा भुरटा अशोक खरात?
नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर खरातच्या या कांडामध्ये सहभागी आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. या दिशेने विशेष तपास पथक (SIT) ने तपास करत तीन डॉक्टरांची चौकशी सुरू केली आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या गुन्ह्यात नाशिकमधील काही नामांकित पॅथॉलॉजी लॅब व मेडिकल देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. वेदनाशामक गोळ्या म्हणजे पेनकिलर सोडल्या तर गुंगी येण्यासाठी वापरल्या गेलेल्या झोपेच्या गोळ्या देखील खरात आपल्या घाणेरड्या कृत्यांमध्ये वापरायचा.
हे ही वाचा>> भयंकर... “भोंदूबाबा अशोक खरात राजकारण्यांना अल्पवयीन मुली पुरवत होता, अन् स्वत:ही...”
या गोळ्या डॉक्टरांच्या प्रस्क्रिपशन शिवाय विकत घेता येत नाहीत किंवा मेडिकल शॉपमधील फार्मसिस्ट विकू शकत नाहीत. कारण गोळ्यांच्या डोस जर अनियंत्रित घेतला तर गुंगी येते, अधिक डोस झाला तर मृत्यूही ओढवू शकतो. याशिवाय पॅथॉलॉजी लॅब आणि सोनोग्राफी सेंटरचा वापर देखील झाला असल्याचा संशय आहे, तो कशासाठी झाला हे ही तपासले जात आहे.
सध्या पोलीस कस्टडीत असलेल्या अशोक खरातची SIT कडून कसून चौकशी सुरू आहे. या तपास पथकाच्या चौकशीत खरात याच्या कार्यपद्धतीबाबत काही गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. महिलांना जाळ्यात ओढल्यानंतर त्यांना गर्भधारणा होऊ नये यासाठी अशोक खरात काही विशिष्ट औषधे किंवा गर्भनिरोधक गोळ्या देत होता का? आणि ही औषधे त्याला कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्याने मिळत होती? या दिशेने देखील आता तपास सुरू आहे. यातील औषधांचा पुरवठा नेमका कोठून झाला? आणि त्यामागे कोणत्या नामांकित क्लिनिक किंवा हॉस्पिटलचे धागेदोरे आहेत? यावर आता तपास यंत्रांनी लक्ष केंद्रित केले आहे









