'मी सध्या कुठे आहे? भारतातच की इंग्लंडला परतलो?' डॉ. संग्राम पाटील यांची फेसबुक पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
सोशल मीडियावर भाजप विरोधात भूमिका घेणारे डॉ. संग्राम पाटील यांच्याविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ते सध्या कुठे आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला होता. याविषयी पाटील यांनी माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मी सध्या कुठे आहे? भारतातच की इंग्लंडला परतलो?'
डॉ. संग्राम पाटील यांची फेसबुक पोस्ट
नेमकं काय म्हणाले?
Dr. Sangram Patil News : सोशल मीडियावर भाजपविरोधात सडेतोड भूमिका घेणारे ब्रिटनस्थित डॉ. संग्राम पाटील हे सध्या कुठे आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याविषयी फेसबुकवर पोस्ट करुन पाटील यांनी माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, 'ते सध्या भारतातच आहेत आणि त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी जारी केलेले लुक आऊट सर्क्युलर अजूनही रद्द करण्यात आलेले नाही.' हे लुकआऊट सर्क्युलर रद्द व्हावे यासाठी मुंबई हायकर्टात धाव घेतल्याची माहितीही पाटील यांनी दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय, जाणून घेऊया.
डॉ. संग्राम पाटील यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी
'मी सध्या कुठे आहे? भारतातच की इंग्लंडला परतलो?' असा प्रश्न अनेक मित्र आणि हितचिंतकांना पडलेला आहे. अशा सर्व जणांना माहिती देणे हे माझे कर्तव्य म्हणून मी ही अपडेट देत आहे.
मी 10 जानेवारी पासून भारतातच आहे. माझ्या विरोधात मुंबई पोलिसांनी लावलेले Look out circular (LOC) अजूनही रद्द केलेले नसल्याने मला घरी युकेला परत जाता आलेले नाही. या प्रकरणी मी माननीय उच्च न्यायालय, मुंबई येथे 20 जानेवारी 2026 रोजी याचिका दाखल केलेली आहे. त्यात माझ्यावर पोलिसांनी केलेली कारवाई आणि लावलेले कलम अयोग्य असून सदर गुन्हा रद्द करून Look Out Circular सुद्धा रद्द करावे अशी प्रार्थना केलेली आहे.
सदर प्रकरणी सुनावणी सुरू असून माझ्या वकिलांमार्फत माननीय उच्च न्यायालयात माझी बाजू व्यवस्थित मांडलेली आहे, सरकार पक्षाने मुंबई पोलिसांची बाजू मांडली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी प्रतिज्ञापत्र सादर करून माझे म्हणणे लिखित स्वरूपात मुद्देसूदपणे सविस्तर मांडलेले आहेत व मला न्याय मिळावा यासाठी माननीय उच्च न्यायालयास विनंती केली आहे.









