प्रेयसीला भेटायला घरी गेला तरुण अन् फसला, प्रेयसीच्या धाकट्या बहिणीने खतरनाक प्लॅन करुन संपवले
प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, प्रेयसीच्या धाकट्या बहिणीनेच ही हत्या केली आहे. यामागे नेमकं कारण काय, जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेयसीला भेटायला घरी गेला तरुण अन् फसला
प्रेयसीच्या धाकट्या बहिणीने खतरनाक प्लॅन करुन संपवले
Crime News : देशाच्या राजधानीतून एक धक्कादायक माहिती बातमी समोर येत आहे. प्रेयसीला भेटायला गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, प्रेयसीच्या धाकट्या बहिणीनेच ही हत्या केली. तरुण आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गुपचूप तिच्या घरी पोहोचला होता. मात्र, तो घरात शिरल्याची माहिती प्रेयसीच्या धाकट्या बहिणीला मिळाली. यानंतर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तरुणाला संपवण्यात आले. दिल्लीच्या फरिदाबाद परिसरातील ही घटना आहे.
धाकट्या बहिणीने रचला कट
मिळालेल्या माहितीनुसार, मानव घरात शिरल्याचे समजताच प्रेयसीच्या धाकट्या बहिणीने तातडीने आपल्या तीन-चार ओळखीच्या तरुणांना घरी बोलावून घेतले. या सर्वांनी मिळून आधी मानवाला घराच्या आतच बेदम मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात आरोपींनी त्याच्यावर चाकूने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मानवची प्रकृती खालावल्यानंतर आरोपींनी स्वतःच त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली.
हे ही वाचा : हनुमान जयंती दिवशी 'या' राशीतील लोकांवर बजरंगबलीचा आशीर्वाद राहणार
उपचारादरम्यान मृत्यू
घटनेची माहिती मिळताच मानवचे कुटुंबीय तातडीने फरीदाबादला पोहोचले. त्यांनी जखमी मानवाला तातडीने उपचारासाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमा खोल असल्याने आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा : ट्रान्सजेंडर अवंतिकाच्या प्रेमापोटी मित्राने मित्राचा काटा काढला, नंतर मृतदेह आंब्याच्या बागेत पुरला
हत्येमागं नेमकं कारण काय?
सध्या दिल्लीतील रुग्णालयात मृतदेहाचे पोस्ट मार्टम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी फरीदाबादच्या पल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. प्रेमसंबंधांतील रागातून ही हत्या झाली की यामागे आणखी काही कारण आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.









