अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचे व्हिडिओ पाहिले अन् तीन वर्षांच्या चिमुरडीचं केलं अपहरण, पुढे घडलं भयानक

मुंबई तक

एका तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिस आरोपीला ताब्यात घेण्यास गेले असता त्याने गोळीबार केला. यामुळे पोलिसांनादेखील गोळीबार करावा लागला. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये अनेक धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराचे व्हिडिओ पाहिले

point

तीन वर्षांच्या चिमुरडीचं केलं अपहरण

point

पुढे घडलं भयानक

Crime News : एका तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी गोळीबारात जखमी करून बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी (31 मार्च) सायंकाळी घराबाहेर खेळत असताना ही चिमुरडी बेपत्ता झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने तपासाची चक्रे फिरवून शोधमोहीम राबवली होती. दरम्यान, पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे पकडले जाण्याच्या भीतीने आरोपीने चिमुरडीला एका पोत्यात बंद करून झाडीत फेकून दिले होते. सुदैवाने, बुधवारी (1 एप्रिल) सकाळी ही मुलगी सुरक्षित अवस्थेत पोलिसांना सापडली. उत्तर प्रदेशातील कनोज परिसरातील ही घटना आहे. 

मोबाईलमध्ये सापडले धक्कादायक व्हिडिओ

या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, गावातीलच अकील नावाच्या तरुणावर पोलिसांचा संशय बळावला. अकील हा विवाहित असून त्याच्या पत्नीचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. मुलीच्या अपहरणापासून तो गावात कोणालाही दिसला नव्हता, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी खबरदारी घेतली आणि तांत्रिक तपास केला असता, अकीलच्या मोबाईल हिस्ट्रीमध्ये लहान मुलांवर अत्याचार कसे करायचे, यासंदर्भातील धक्कादायक व्हिडिओ सापडले. यावरून त्याचा हेतू अत्यंत भयानक असल्याचे स्पष्ट झाले.

हे ही वाचा : सुनेला रात्री 12 वाजता विधीसाठी केली जबरदस्ती, सर्वच पुरुष नग्नावस्थेत, सासऱ्याने तिच्या उघड्या अंगावर...

गोळीबार करुन अटक

गुरुवारी (2 एप्रिल) पहाटे अकील हा बायपासवरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे एसओजी आणि स्थानिक पोलिसांनी परिसराला वेढा घातला. पोलिसांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले असता, अकीलने पोलिसांवर गोळीबार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक गोळी अकीलच्या पायाला लागली आणि तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले.

हे ही वाचा : अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या अडचणीत वाढ, मावळमधील शेतकऱ्याची थेट न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?

कठोर कारवाईचे आश्वासन

पोलीस कोठडीत असताना आणि जखमेच्या वेदनेने अकीलने आपला गुन्हा कबूल केला असून तो पोलिसांसमोर गयावया करू लागला. पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी सांगितले की, जर पोलीस वेळीच सक्रिय झाले नसते, तर आरोपीने चिमुरडीसोबत काहीतरी भयानक कृत्य केले असते. आरोपीच्या मोबाईलमधील डेटा त्याच्या विकृत मानसिकतेची साक्ष देत असून, सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
 

हे वाचलं का?