ऊसाच्या शेतात सापडला तरुणीचा मृतदेह, हात बांधलेले, गळ्यावर जखमा...शीलासोबत नेमकं काय घडलं?

मुंबई तक

एका ऊसाच्या शेतात तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. ऊसाची तोडणी सुरु असतानाच हा मृतदेह सापडला. या मृत तरुणीचे हात बांधून तिला ऊसाच्या शेतात टाकण्यात आल्याचे बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

ऊसाच्या शेतात सापडला तरुणीचा मृतदेह

point

हात बांधलेले, गळ्यावर जखमा..

point

शीलासोबत नेमकं काय घडलं?

Crime News : गावापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या ऊसाच्या शेतात एका तरुणीचा मृतदेह गुरुवारी (2 एप्रिल) सकाळी आढळून आला. शीला असं मृत तरुणीचं नाव असून गेल्या चार दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला, ते पाहता कुटुंबीयांनी तिची हत्या झाल्याचा दाट संशय व्यक्त केला आहे. मृतदेहाचे हात दोरीने बांधलेले होते आणि तो पालथ्या अवस्थेत पडलेला होता, ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा परिसरातील ही घटना आहे.

शौचास जाते म्हणून बाहेर पडली अन्..

29 मार्च रोजी दुपारी शीला शौचास जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती, मात्र ती परतलीच नाही. बराच वेळ शोध घेऊनही ती न सापडल्याने 30 मार्च रोजी अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या काळात पोलिसांनी तपासात गांभीर्य दाखवले नाही आणि उपनिरीक्षकांनी घटनास्थळी भेटही दिली नाही, असा आरोप तिचे वडील अशोक कुमार यांनी केला आहे. अखेर गुरुवारी सकाळी ऊसाची तोडणी सुरु असताना हा मृतदेह लोकांच्या नजरेस पडला.

हे ही वाचा : सोलापूर : बायकोमुळे नैराश्यात असलेल्या वडिलांचे संतापजनक कृत्य; तीन चिमुकल्यांना विष पाजून घेतला स्वतःचा जीव

ऊसाच्या शेतात फेकला मृतदेह

मृतदेहाची पाहणी केली असता, शीलाच्या गळ्यावर जखमेच्या खुणा होत्या आणि मृतदेहातून दुर्गंधी येत होती. अशोक कुमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलीचे हात बांधलेले असल्याने तिची निर्घृण हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह शेतात फेकून देण्यात आला असावा. मृत शीला ही दोन बहिणींमध्ये लहान होती. तिच्या मृत्यूमुळे गावात भीतीचे आणि शोकाकुल वातावरण पसरले असून, या घटनेबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

हे ही वाचा : तीन मुलांची आई प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडली, गावकऱ्यांनी पिलरला बांधलं अन्...

तरुणीच्या मोबाईलवरुन तपास सुरु

या प्रकरणाची दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, मृत्यूचे नेमके कारण पोस्ट मार्टम अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाच्या तपासासाठी चार पथके तैनात केली असून प्रभारी निरीक्षकांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी तरुणीचा मोबाईल ताब्यात घेतला असून, त्याद्वारे तिचे शेवटचे संभाषण आणि लोकेशन तपासून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
 

हे वाचलं का?