मुंबईतील मुलुंड मेट्रोचा निर्माणाधीन स्लॅब कोसळला, पोलिसांची धडाकेबाज कारवाई, पाच जणांना पोलीस कस्टडी

मुंबई तक

Mumbai News : मुंबईतील मुलुंड परिसरात 14 फेब्रुवारी रोजी मेट्रोचा निर्माणाधीन स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आणि एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai News
Mumbai News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील मुलुंड मेट्रो निर्माणाधीन पूल कोसळला

point

दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी आणि एकाचा मृत्यू

point

पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली

Mumbai News : मुंबईतील मुलुंड परिसरात 14 फेब्रुवारी रोजी मेट्रोचा निर्माणाधीन स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आणि एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. 

हे ही वाचा : 'गणेश नाईक यांना खुमखुमी आली असेल तर....', श्रीकांत शिंदेंचं ओपन चॅलेंज; नेमकं कोणतं आव्हान दिलं?

पोलिसांची पाच जणांवर कारवाई 

या झालेल्या दुर्घटनेत जबाबदार असणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये मिलान रोड बिल्डकोन कंपनीचे प्रकल्प संचालक हरीश चौहान प्रकल्प व्यवस्थापक कुलदीप सपकाळ, उपसंचालक सौरभ सिंग, पर्यवेक्षक प्रशांत भोईर आणि डीबी हिल एलजीबी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक अवधूत इनामदार यांचा देखील यात समावेश आहे. 

18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी 

या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले, अशातच न्यायालयाने त्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनाण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. पोलिस सध्या संपूर्ण प्रकरणाचा सखोलपणे तपास करत आहेत. यामध्ये कुठे आणि कोणत्या पातळीवर सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाले हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

हे ही वाचा : जालन्यातील SBI बँकेच्या वाड्रीगोद्री शाखेत मध्यरात्री दरोडा, गॅस कटरने शटर तोडलं, लाखो रुपये केले लुटून नेले

दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दुसरीकडे विरोधकांनी सरकारच्या विकासकामांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींचा शोध घेतला.

हे वाचलं का?

    follow whatsapp