19 वर्षीय तरुणीचा गल्लीतल्या अल्पवयीन मुलावर अपहरण करुन अत्याचार, कोणाला सांगू नये म्हणून धमक्याही दिल्या
Mumbai Crime News : या प्रकरणाची सुरुवात गेल्या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये झाली, जेव्हा आरोपी तरुणीने मुलाला फूस लावून आपल्या घरी बोलावले आणि त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नाही, तर याबद्दल कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही तिने दिली होती. ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत आरोपी तरुणीने मुलाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच ठेवला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
19 वर्षीय तरुणीचा गल्लीतल्या अल्पवयीन मुलावर अपहरण करुन अत्याचार
कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी
Mumbai Crime News ,मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील मानखुर्द परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 19 वर्षीय तरुणीने 17 अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय. एकतर्फी प्रेमातून आणि लग्नास नकार दिल्याने तरुणीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेने मुंबईसह राज्यात खळबळ उडाली असून, आरोपी तरुणीवर POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मानखुर्द पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि आरोपी तरुणी एकाच परिसरात राहणारे आहेत. आरोपी तरुणीचे पीडित मुलावर एकतर्फी प्रेम होते आणि ती गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. या प्र+
या प्रकरणाची सुरुवात गेल्या वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये झाली, जेव्हा आरोपी तरुणीने मुलाला फूस लावून आपल्या घरी बोलावले आणि त्याच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नाही, तर याबद्दल कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही तिने दिली होती. ऑगस्ट 2025 ते फेब्रुवारी 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत आरोपी तरुणीने मुलाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच ठेवला. जेव्हा कधी ती घरी एकटी असे, तेव्हा ती मुलाला धमकी देऊन बोलावून घेत असे. तिच्या सततच्या दबावाला आणि धमक्यांना कंटाळून मुलाने अखेर तिच्याशी लग्न करण्यास ठाम नकार दिला. हा नकार सहन न झाल्याने तरुणीने आधी स्वतःला इजा पोहोचवण्याची धमकी दिली आणि नंतर संधी साधून मुलाचे अपहरण केले.
हेही वाचा : 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? त्यांनी पळ का काढला'; संजय राऊतांनी ट्वीट केला व्हिडीओ










