'मी अगोदर नास्तिक होते.., पण नंतर..', अभिनेत्री रिंकू राजगुरुचं वक्तव्य चर्चेत; आस्तिक कशी झाली? तेही सांगितलं
Rinku Rajguru : "माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या की, मी तिकडे वळायला लागले. मला वाटलं की, इथेच आशा आहे आणि शांती देखील आहे. मला घरातही सकाळी देवपूजा करायला. जप करायला आवडतं. या गोष्टी केल्या की, मला फ्रेश वाटतं. त्यामुळ मी हे स्वत:साठी करते. मी केदारनाथला गेले तेव्हा देवावर विश्वास होता असं नव्हतं. मला अचानक केदारनाथला जायचंय, अशी इच्छा झाली"
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मी अगोदर नास्तिक होते.., पण नंतर..',
अभिनेत्री रिंकू राजगुरुचं वक्तव्य चर्चेत
आस्तिक कशी झाली? तेही सांगितलं
Rinku Rajguru : "मी अगोदर नास्तिक होते. केदारनाथला गेल्यानंतर आणि काही घटनांनंतर मला थोडा-थोडा विश्वास बसायला लागला की असतं. मग त्यानंतर मी उपवास वगैरे करत गेले. त्याचा अनुभव आलेला. आता-आता मी या सगळ्या गोष्टींकडे वळले आहे. पूजा असेल सण-उत्सव असतील. याच्यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. पण काहीतरी एनर्जी देखील असते. जी तुम्हाला खेचते", असं अभिनेत्री रिंकू राजगुरु म्हणाली. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत तिने आस्तिक कशी बनली? याबाबत भाष्य केलं.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंच्या लेकाची तब्बेत बिघडली, तेजस ठाकरेंवर 3 दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु
रिंकू राजगुरु म्हणाली, "माझ्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या की, मी तिकडे वळायला लागले. मला वाटलं की, इथेच आशा आहे आणि शांती देखील आहे. मला घरातही सकाळी देवपूजा करायला. जप करायला आवडतं. या गोष्टी केल्या की, मला फ्रेश वाटतं. त्यामुळ मी हे स्वत:साठी करते. मी केदारनाथला गेले तेव्हा देवावर विश्वास होता असं नव्हतं. मला अचानक केदारनाथला जायचंय, अशी इच्छा झाली. पूजा म्हणाली, असं नसतं. त्याचं काहीतरी प्लॅनिंग देखील करावं लागतं. पण मी म्हटलं, नाही मला जायचं आहे. तू तिकीट बुक कर... तिने मला विचारलं चालत जाणार आहोत? मी म्हणाले हो... त्यादिवशी गुरुवार आणि पौर्णिमा होते, आम्ही चालत वगैरे गेलो. मी खूप थकले होते, रडले होते. नाही जेवायचं खूप थंडी आहे, असं म्हणत होते. मी केदारनाथचं दर्शन घेतलं. मी बालिश आहे, मी रडत होते. का? तर मला चॉपर मिळू दे देवा....असं म्हणत होते. आता तो स्टॅमेना नाहीये. पुढे लगेच आमची फ्लाईट होती. तिथे एक माणूस म्हणाला, बसा तुम्हाला चॉपर मिळेल. अंधार पडायला लागला. तरी मिळत नव्हता. मी देवाला म्हणाले, मी संपूर्ण फॅमिली घेऊन तुझ्याकडे येईल. प्लीज मला चॉपर मिळू दे.. मला या गोष्टी इतक्या मॅटर करतात, हे माहिती नव्हतं. पण चॉपर येत नव्हता म्हणून रागावले. मी म्हणाले, काय तुझा देव.. एवढं म्हणाले, फॅमिलाला घेऊन येते. तरी तो चॉपर देतोय का? आम्ही निघालो तितक्यात एक माणूस आला. तुम्हाला चॉपर पाहिजे होता ना? आधार कार्ड आहे का? आमच्याकडे दोनच जागा आहेत. पण तिथून निघताना आनंदात पळत चालले आणि मंदिरासमोर पडले. त्यावेळी माझा गुडघा फुटला. पूजा म्हणाली, तू इतकं त्याला बोललीस, इतकं कोण बोलतं?"
पुढे बोलताना रिंकू राजगुरु म्हणाली, "मी खरचं त्यावेळी शंकराला वाईट बोलले होते. मी त्यावेळी रडायला लागले. त्यावेळी मला तिथेच माझी शिक्षा मिळाली. मग पायलेटच्या शेजारी बसून आम्ही खाली आलो. मला त्यावेळी खूप लागलं होतं. त्यावेळी पासूनच मी आस्तिक व्हायला लागले. काही चुकीची माणसं आयुष्यात आली, त्यामुळे मी आणखीच या बाजूला आले. मला तो नवस पूर्ण करायला फॅमिलीला घेऊन जायचंय...अजून मी गेलेली नाही. आई-बाबांना शाळेतून वेळ मिळेल तेव्हा नेणार आहे. याचवर्षी मी जाईल त्यांना केदारनाथला घेऊन.."










