नांदेड : 'तू मला मनोरुग्ण ठरवतेस'; रागातून आईची हत्या, मग मुलाने केली आत्महत्या
Nanded Crime News : जेवणातून औषधे दिली जात असल्याच्या संशयातून नांदेडमध्ये तरुणाने आईवर बॅट आणि रॉडने हल्ला केला. आईचा मृत्यू झाल्यानंतर त्याने दुसऱ्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नांदेड : 'तू मला मनोरुग्ण ठरवतेस';
रागातून आईची हत्या, मग मुलाने केली आत्महत्या
Nanded Crime News : नांदेड शहरातील तरोडा भागातील राहुल कॉलनीमध्ये शनिवारी रात्री उशिरा आई आणि मुलाच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. प्रतीक चौथरे (24) आणि त्याची आई भारती चौथरे (52) अशी मृतांची नावे आहेत. प्रतीकने बॅट आणि रॉडने आईवर हल्ला केला. या हल्ल्यात भारती चौथरे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रतीकने घरातील दुसऱ्या खोलीत छताच्या हुकाला आईच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रतीकवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. तो औषधे घेत नसल्याने आई जेवणातून आपल्याला औषधे देत असल्याचा संशय त्याला होता, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. याच कारणावरून तो आईसोबत अनेकदा वाद घालत होता.
हेही वाचा : नाशकात एकामागून एक भुकंपाचे धक्के, घर सोडून लोकं पळाले, रात्री उशिरा काय घडलं?
आईची हत्या केल्यानंतर मुलाने घेतला गळफास
राहुल कॉलनीतील बालाजी सोपान चौथरे हे सीआरपीएफमध्ये पाँडिचेरी येथे कार्यरत आहेत. त्यांची मुलगी प्राची पुणे येथे शिक्षण घेत आहे. त्यामुळे नांदेडमध्ये भारती चौथरे आणि प्रतीक हे दोघेच राहत होते. प्रतीकची मानसिक स्थिती खालावत असल्याने त्याला नांदेडमधील एका मनोविकार तज्ज्ञाकडे उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, आपण मनोरुग्ण नसल्याचे सांगत तो आई-वडिलांशी वाद घालत असे. शनिवारी रात्री त्याने घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद केल्या आणि आईवर बॅट व रॉडने हल्ला केला. आईची हत्या केल्यानंतर त्याने स्वतःही गळफास घेतला. भाग्यनगर पोलिसांत प्रतीकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : 'मामी, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय...' भाचा पाठ सोडेना; शेवटी घडलं भयंकर
