ज्या मुलीला लहानाचं मोठं केलं तिनेच संपवलं, प्रियकर अन् आईचाही सहभाग
Crime News mathura : मथुरेत मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या वडिलांची हत्या केल्याचा आरोप. आई, मुलगी आणि प्रियकराला अटक; पोलिसांकडून मृतदेहाचा शोध सुरू.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ज्या मुलीला लहानाचं मोठं केलं तिनेच संपवलं
प्रियकर अन् आईचाही सहभाग
उत्तर प्रदेशातील मथुरा येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या वडिलांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडात त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलीचा प्रियकर सहभागी असल्याचा आरोप आहे. गोविंद नगर परिसरातील जयसिंहपुरा येथील मनोज सोनी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या पत्नी, मुलगी आणि विमल चौधरी यांना अटक केली आहे. मुलीच्या प्रेमसंबंधाला वडिलांचा विरोध असल्याने हे हत्याकांड घडल्याचे तपासात समोर आले आहे.
हेही वाचा : निवडणुकीत दिलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द, संजय शिरसाट जरांगेंचा उल्लेख करत काय बोलले?
प्रेमसंबंधाला अडथळा ठरत असल्याने बापाची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज सोनी हे त्यांच्या मुलीच्या विमल चौधरीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या विरोधात होते. प्रेमसंबंधाला अडथळा ठरत असल्याने मनोज यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मनोज यांच्या पत्नीला, मुलीला आणि विमल चौधरीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत तिन्ही आरोपींनी मनोज यांच्या हत्येची कबुली दिल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मनोज सोनी यांची इलेक्ट्रिक स्कूटीही जप्त केली आहे.
हेही वाचा : नाशकात एकामागून एक भुकंपाचे धक्के, घर सोडून लोकं पळाले, रात्री उशिरा काय घडलं?
