बीडमधील जातीय द्वेषास कोण कोण जबाबदार? शिरसाटांनी थेट नाव सांगितलं..

मुंबई तक

sanjay shirsat on beed caste hatred : बीडमधील जातीय द्वेषाच्या वातावरणावर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी थेट भाष्य केले. मराठा विरुद्ध वंजारी वाद, राजकीय नेत्यांची भूमिका आणि सामूहिक जबाबदारीवर त्यांनी स्पष्ट मत मांडले.

ADVERTISEMENT

sanjay shirsat on beed caste hatred
sanjay shirsat on beed caste hatred
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीडमधील जातीय द्वेषास कोण कोण जबाबदार?

point

संजय शिरसाटांनी थेट नाव सांगितलं..

sanjay shirsat on beed caste hatred : बीड जिल्ह्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि राजकीय मतभेदांमुळे जातीय द्वेषाचे वातावरण तयार झाल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई Tak च्या चावडीवर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना बीडमधील परिस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आला. बीडमध्ये सोशल मीडिया तसेच दैनंदिन व्यवहारांमध्येही विरुद्ध जातीच्या लोकांशी संबंध ठेवायचे नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा मुद्दा त्यांच्यासमोर मांडण्यात आला. त्यावर बोलताना संजय शिरसाट यांनी बीडमध्ये अनेक वर्षांपासून मराठा विरुद्ध वंजारी असा प्रकार सुरू असल्याचे थेट सांगितले. या प्रकारामागे असलेल्या राजकीय नेत्यांनाही आपण अनेक वेळा सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणासाठी या परिस्थितीचा वापर योग्य वाटत असला, तरी आता समाजात पडलेली फट खूप मोठी झाली आहे, असे शिरसाट म्हणाले.

हेही वाचा : 'मामी, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय...' भाचा पाठ सोडेना; शेवटी घडलं भयंकर

बीडमधील जातीभेदाचे परिणाम विकासावरही झाले - संजय शिरसाट 

शिरसाट यांनी बीडमधील परिस्थितीचे गंभीर परिणाम होत असल्याचेही सांगितले. एखाद्याच्या हॉटेलमध्ये जायचे नाही, त्याला शेतात कामाला ठेवायचे नाही किंवा त्याच्याकडून काही विकत घ्यायचे नाही, अशा प्रकारचे वातावरण तयार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. याचा परिणाम केवळ जिल्ह्यातील सामाजिक वातावरणावर नाही, तर बीडच्या विकासावरही झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या परिस्थितीमुळे बीड जिल्ह्याबाबत एक वेगळे चित्र निर्माण झाले आहे आणि उद्योग येण्यासही अडथळा निर्माण होत आहे. बीड म्हटले की नकोच, अशी भावना निर्माण होऊन त्यावर पहिली फुली मारली जाते, असेही त्यांनी म्हटले. या परिस्थितीला कारणीभूत कोण, असा प्रश्न उपस्थित करताना शिरसाट यांनी राजकीय पुढाऱ्यांकडे बोट दाखवले. आपापसातील मतभेद इतक्या टोकाला नेल्याने त्याचा दूरगामी परिणाम महाराष्ट्रावरही होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : जालना : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् नंतर 7 महिने...,16 वर्षीय मुलीसोबत काय घडलं?