'मामी, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय...' भाचा पाठ सोडेना; शेवटी घडलं भयंकर

मुंबई तक

मध्यप्रदेशातील सिंगरोली जिल्ह्यात प्रेमसंबंधाचा धक्कादायक आणि थरारक अंत झाला आहे. एका मामीने आपल्या भाच्याचा निर्घृण खून केला आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

मामी, मला तुझ्यासोबत लग्न करायचंय...

point

भाचा पाठ सोडेना

point

शेवटी घडलं भयंकर

Crime News : मध्यप्रदेशातील सिंगरोली जिल्ह्यात प्रेमसंबंधाचा धक्कादायक आणि थरारक अंत झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे सत्यप्रकाश गुप्ता या 28 वर्षीय तरुणाचा त्याच्याच कारच्या ड्रायव्हिंग सीटवर मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोरवा पोलिसांनी तत्परतेने तपासचक्र फिरवून या गूढ प्रकरणाचा छडा लावण्यास सुरुवात केली.

मामीसोबत अनैतिक संबंध

पोलीस तपासात आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमागील धक्कादायक सत्य समोर आले आहे. मृत सत्यप्रकाश गुप्ता याचे त्याची नात्याने मामी लागणाऱ्या 35 वर्षीय प्रिया गुप्ता हिच्यासोबत गेल्या अनेक वर्षांपासून गुप्त प्रेमसंबंध सुरू होते. काही काळ हा प्रकार सुरळीत चालला; मात्र गेल्या काही दिवसांपासून सत्यप्रकाश तिच्यावर लग्नासाठी आणि एकत्र राहण्यासाठी अवाजवी दबाव टाकत होता. तिच्याशिवाय जगू शकत नसल्याचे सांगत तो तिच्यासोबत जगण्या-मरण्याच्या शपथा घेऊ लागला होता, ज्यामुळे त्यांच्यातील तणाव कमालीचा वाढला होता.

हे ही वाचा : कोचिंग क्लासमध्ये 10 वीच्या विद्यार्थीनीवर शिक्षकाकडून अत्याचार, दुसऱ्या शिक्षकाने काढला व्हिडिओ

अखेर मामी कंटाळली...

दुसऱ्या बाजूला, आरोपी महिला प्रिया गुप्ता हिला सामाजिक प्रतिष्ठा, लोकलाज आणि कौटुंबिक बदनामीची प्रचंड भीती वाटत होती. त्यामुळे ती सत्यप्रकाशसोबत उर्वरित आयुष्य घालवण्यास तयार नव्हती. त्याच्या रोजच्या हट्टाला आणि वाढत्या त्रासाला कंटाळून तिने या नात्याचा कायमचा काटा काढण्याचा क्रूर निर्णय घेतला. सत्यप्रकाशचा दबाव असह्य झाल्यावर महिलेने त्याच्याच ओढणीने गळा आवळून त्याची निर्घृण हत्या केली. यानंतर ही हत्या नसून अपघात आहे असा आभास निर्माण करण्यासाठी तिने अत्यंत चलाखीने त्याचा मृतदेह कारच्या ड्रायव्हिंग सीटवर नेऊन बसवला.

हे ही वाचा : बर्थडेचं कारण सांगून तरुणीला फ्लॅटवर बोलावलं, तरुणाने संधी साधून पीडितेशी ठेवले शरीरसंबंध

अपघाताचा बनवा फसला

मात्र, आरोपी महिलेचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये महिला मृतदेहाला कारपर्यंत घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आली. या भक्कम तांत्रिक पुराव्याच्या आधारे अपघाताचे नाटक उघड पडले आणि पोलिसांनी खाक्या दाखवताच ती पोपटासारखी बोलू लागली. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपी प्रिया गुप्ता हिला अटक करून भारतीय न्याय संहितेच्या (BNS) गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून तिला न्यायालयात हजर केले आहे.