बर्थडेचं कारण सांगून तरुणीला फ्लॅटवर बोलावलं, तरुणाने संधी साधून पीडितेशी ठेवले शरीरसंबंध
Crime News : तरुणाने बर्थडे पार्टीचा बहाणा करत तरुणीला घरी बोलावून लैंगिक अत्याचार केला. नंतर लग्नाचं आमिष दाखवून दुसऱ्यांदा तिच्यावर शरीरसंबंध ठेवले आणि अचानकपणे लग्नास नकार देऊन तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बर्थडे पार्टीचा बहाणा करत तरुणीला घरी बोलावलं
नंतर शरीरसंबंध ठेवले
आरोपीनं पीडितेकडून 1.5 लाख रुपये उकळले
Crime News : तरुणाने बर्थडे पार्टीचा बहाणा करत तरुणीला घरी बोलावून लैंगिक अत्याचार केला. नंतर लग्नाचं आमिष दाखवून दुसऱ्यांदा तिच्यावर शरीरसंबंध ठेवले आणि अचानकपणे लग्नास नकार देऊन तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. ही घटना बंगालच्या कोलकातामधील जादवपुर परिसरातील आहे.
हे ही वाचा : रॅपिडो चालकाचे अश्लील कृत्य, 'तसले' व्हिडिओ पाहताना महिला प्रवाशानं रेड हँड पकडलं
घडलेल्या घटनेतील आरोपीची अनुभव भट्टाचार्य अशी ओळख समोर आल्याची पोलिसांची माहिती आहे. पोलिसांनुसार, पीडित तरुणी ही आरोपी अनुभवच्या ओळखची होती, दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. नंतर दोघांमधील बोलणं वाढत गेलं आणि मैत्रीचं नात्यात रुपांतर झालं.
वाढदिवसाचं कारण सांगून तरुणीला घरी बोलावलं
पुढे पोलिसांच्या माहितीनुसार, नंतर दोघांनी एकमेकांचे फोन नंबर मिळवून एकमेकांशी बोलू लागले होते. दोघेही अनेकदा एकमेकांना भेटले होते. नंतर अनुभवने तरुणीला वाढदिवसाचं कारण सांगून घरी बोलावलं. जेव्हा तरुणी घरी पोहोचली असता, फ्लॅटमध्ये केवळ अनुभवच उपस्थित होता.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत दुसऱ्यांदा शरीरसंबंध
संबंधित प्रकरणात असा आरोप करण्यात आला की, तरुणीवर अनुभवने शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. यानंतर त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, नंतर पीडितेवर दुसऱ्यांदा लैंगिक अत्याचार केला होता. बिजनेस करण्याच्या नावाने आरोपीनं पीडितेकडून 1.5 लाख रुपये उकळले.
