निवडणुकीत दिलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द, संजय शिरसाट जरांगेंचा उल्लेख करत काय बोलले?
sanjay shirsat on manoj jarange patil mumbai tak chavadi : कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्याच्या मुद्द्यावर संजय शिरसाट यांनी मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख करत भूमिका स्पष्ट केली. चुकीचे प्रमाणपत्र काढले जात असेल तर ते रद्द होईल, असे शिरसाट म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
निवडणुकीत दिलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द
संजय शिरसाट जरांगेंचा उल्लेख करत काय बोलले?
मुंबई तकच्या ‘चावडी’वर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला. संभाजीनगर, बीड आणि परभणीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मराठा समाजातील काही उमेदवारांनी दिलेली कुणबी प्रमाणपत्रे बोगस ठरून रद्द झाल्याची बातमी समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील हे केवळ शिक्षणासाठी आरक्षणाची मागणी करत आहेत, मात्र कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जात असल्याने यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून केला जात असल्याचा प्रश्न संजय शिरसाट यांना विचारण्यात आला.
हेही वाचा : जालना : आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् नंतर 7 महिने...,16 वर्षीय मुलीसोबत काय घडलं?
शिरसाटांनी सांगितली बाळासाहेबांची भूमिका
यावर बोलताना संजय शिरसाट यांनी शिवसेना प्रमुखांची पूर्वीपासूनची भूमिका सांगितली. आरक्षण द्यायचे असेल तर ते आर्थिक निकषावर देण्यात यावे, अशी भूमिका शिवसेना प्रमुखांची होती, असे ते म्हणाले. त्या वेळी काही लोकांनी या भूमिकेला विरोध केला होता. मात्र आता आरक्षण शिक्षणासाठी आणि इतर बाबींसाठी हवे असल्याचे सर्वांकडून सांगितले जात असल्याचे शिरसाट यांनी नमूद केले. कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया त्यांच्या विभागामार्फत सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Govt Jobs : भारतीय विमान प्राधिकरणात नोकरीची संधी, वर्षाला लाखो रुपयांचं पॅकेज
