नाशकात एकामागून एक भुकंपाचे धक्के, घर सोडून लोकं पळाले, रात्री उशिरा काय घडलं?
nashik earthquake update : नाशिक जिल्ह्यात रात्री 10 वाजल्यानंतर दिंडोरीसह पाच तालुक्यांना भूकंपाचे धक्के जाणवले. धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही घरांना तडे गेले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नाशकात एकामागून एक भुकंपाचे धक्के
घर सोडून लोकं पळाले, रात्री उशिरा काय घडलं?
nashik earthquake update : नाशिक जिल्ह्यात रात्री उशिरा एकामागून एक भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. रात्री 10 वाजल्यानंतर दिंडोरी, निफाड, पेठ, सुरगाणा आणि इगतपुरी या तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली असून नाशिक शहरापासून सुमारे 47 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. केंद्रबिंदू दिंडोरी तालुक्यातील भानवड गावाच्या जवळ असल्याची माहिती आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच अनेक नागरिक घाबरून घराबाहेर पडले. काही नागरिकांनी रात्र घराबाहेरच काढली. पुन्हा भूकंपाचा धक्का बसून घरांची पडझड होण्याची भीती नागरिकांच्या मनात होती.
हेही वाचा : विद्यार्थिनीवर शिक्षकाने केला बलात्कार, वडिलांना पाठवले अश्लील फोटो, पुढं काय घडलं?
घरांच्या भिंतींची पडझड, अनेक तालुक्यात सौम्य धक्के
पेठ आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये तीनपेक्षा जास्त वेळा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील शेवटचा धक्का तुलनेने अधिक तीव्र होता. या धक्क्यांनंतर ग्रामीण भागातील काही घरांच्या भिंतींना हादरे बसले असून घरांना तडे गेल्याची माहिती आहे. काही ठिकाणी घरांच्या भिंतींची पडझड झाली असून घरातील सामान अस्ताव्यस्त झाल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची किंवा कोणाला इजा झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भूकंपाचे केंद्र दिंडोरी तालुक्यात असल्याने भानवड गावाच्या आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने रात्री परिसरात गर्दी झाल्याचेही दिसून आले.
हेही वाचा : Govt Jobs : भारतीय विमान प्राधिकरणात नोकरीची संधी, वर्षाला लाखो रुपयांचं पॅकेज
