प्रेयसीची हत्या करून मृतदेह पेटवला, इन्स्टावाल्या लव्हस्टोरीचा भयानक एन्ड का झाला?
instagram love story : इन्स्टाग्रामवरून सुरू झालेल्या पाच वर्षांच्या प्रेमसंबंधाचा आंध्र प्रदेशात भीषण अंत झाला. दुसऱ्या पुरुषाशी बोलत असल्याच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेयसीची हत्या करून मृतदेह पेटवला
इन्स्टावाल्या लव्हस्टोरीचा भयानक एन्ड का झाला?
instagram love story : आंध्र प्रदेशातील पलनाडु जिल्ह्यात इंस्टाग्रामवरून सुरू झालेल्या प्रेमकथेचा अतिशय धक्कादायक अंत झाला आहे. दुसऱ्या पुरुषाशी बोलत असल्याच्या संशयातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीची नियोजनबद्ध पद्धतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने आधी प्रेयसीला विश्वासात घेऊन एका निर्जन ठिकाणी बोलावले. त्यानंतर तिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेहावर पेट्रोल टाकून आग लावली आणि घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
हेही वाचा : निवडणुकीत दिलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द, संजय शिरसाट जरांगेंचा उल्लेख करत काय बोलले?
मिळालेल्या माहितीनुसार, चिलाकलुरिपेट येथील हसीना ही गुंटूर जिल्ह्यातील मितलापल्ली येथील एका महाविद्यालयातून बी.टेकचे शिक्षण घेत होती. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच तिची इंस्टाग्रामच्या माध्यमातून पलनाडु जिल्ह्यातील करमपुडी मंडलमधील इनुपराजुपल्ली येथील बाला सैदुलु याच्याशी ओळख झाली. हळूहळू या ओळखीचे रूप प्रेमसंबंधात झाले. दोघेही मागील पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. बी.टेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर हसीनाला सुल्लुरपेट येथील एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली. दुसरीकडे बाला सैदुलु हा आपल्या गावातच राहून शेतीचे काम करत होता. हसीनाला नोकरी मिळाल्यानंतर तिचे काम वाढले आणि बाला सैदुलुशी तिचा संवाद कमी झाला.
हेही वाचा : निवडणुकीत दिलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द, संजय शिरसाट जरांगेंचा उल्लेख करत काय बोलले?
