राजू शेट्टींच्या लढ्याला यश, 61 तासांच्या संघर्षानंतर ऊसदराचा फॉर्म्युला ठरला, किणी टोलनाक्यावर रात्री काय घडलं?

राजू शेट्टी यांनी ऊसाच्या दरासाठी पुकारलेल्या लढ्याला अखेर यश मिळालं आहे. साखरेला 4,200 रुपये इतका दर देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

Kolhapur Sugarcane Price Agitation
Kolhapur Sugarcane Price Agitation
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अखेर ऊसदराचा तिढा सुटला

point

61 तासांच्या संघर्षाला यश

point

रात्री उशीरा काय घडलं?

कोल्हापूर, दीपक सूर्यवंशी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर येथील किणी टोल नाक्याजवळ सुरू केलेले 61 तासांचे चक्काजाम आंदोलन अखेर रात्री उशिरा मागे घेण्यात आले. ऊस दराबाबत प्रशासकीय मध्यस्थीनंतर तोडगा निघाल्याने शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन स्थगित करण्याची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी, गुलाल आणि फुलांची उधळण करत जोरदार जल्लोष साजरा केला.

या निर्णयामुळे शनिवारी (7 नोव्हेंबर) पुकारण्यात आलेला बंद मागे घेण्यात आला असून, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे ही वाचा : Weather Report: मुंबई, ठाणे, पुणेकरांनो लक्ष द्या! पाहा पावसाची किती शक्यता?

साखरेच्या दराचा फॉर्म्युला काय?

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आवाडे आणि साखर कारखाना प्रतिनिधी यांच्यात झालेल्या प्रदीर्घ बैठकीत उसाच्या सुधारीत दराचा नवा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. नव्या प्रस्तावानुसार, शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन 3,900 रुपये थेट बँक खात्यात दिले जातील. त्यानंतर गळीत हंगाम संपल्यानंतर अतिरिक्त 100 रुपये दिले जातील. तसेच साखरेचा बाजारभाव  4,500 रुपयांपर्यंत पोहोचल्यास आणखी 200 रुपये प्रतिटन दिले जातील. अशा प्रकारे शेतकऱ्यांना प्रतिटन एकूण 4,200 रुपयांपर्यंत दर मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे, ज्यातील शेवटचे 200 रुपये साखरेच्या बाजारभावावर अवलंबून असतील.

हे ही वाचा : बीड : पोलीस भरतीत बोगस खेळाडूंचं रॅकेट उघडकीस आणलं अन् झाला मृत्यू, कुटुंबियांचा गंभीर आरोप

किणी टोलनाक्यावर काय घडलं?

बैठकीत झालेल्या या कराराची सविस्तर माहिती शिष्टमंडळाने किणी टोल नाक्यावर उपस्थित हजारो शेतकऱ्यांना आणि राजू शेट्टी यांना दिली. राजू शेट्टी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांची संमती मिळवल्यानंतर 61 तासांपासून धगधगणारे हे आंदोलन अधिकृतपणे थांबवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गेल्या तीन दिवसांपासून पूणे-बेंगळुरू महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत होण्यास मदत झाली आहे. आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या आणि ट्रक्सच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.