लाइव्ह

Maharashtra lok sabha 2024 second phase voting live : दुसऱ्या टप्प्यात 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात किती टक्के मतदान?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Maharashtra Lok Sabha election Phase two Latest Update : देशातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 88 जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यासोबतच मणिपूरमधील बाह्य लोकसभा मतदारसंघातील उर्वरित भागातही मतदान होत आहे. (Akola Lok Sabha Amravati Lok Sabha Buldhana Lok Sabha Wardha Lok Sabha Yavatmal-Washim Lok Sabha Hingoli Lok Sabha Nanded Lok Sabha Parbhani Lok Sabha)

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8 जागांसह आज केरळमधील सर्व 20, कर्नाटकातील 14, राजस्थानमधील 13, मध्य प्रदेशातील 6, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी 3, त्रिपुरामध्ये प्रत्येकी 1 जागांसाठी मतदान होत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दोन्ही लोकसभा जागांवर होत आहे. 

मतदानासंदर्भातील सर्व अपडेट्स वाचा...

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:43 PM • 26 Apr 2024

    दुसऱ्या टप्प्यात 05 वाजेपर्यंत महाराष्ट्रात किती टक्के मतदान?

    1. नांदेड लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 52.47 टक्के एवढं मतदान झालं आहे.

    2. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 52.24 टक्के एवढं मतदान झालं आहे.

    3. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.04 टक्के मतदान झाले.

    4. वर्धा लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 56.66 टक्के एवढं मतदान झालं आहे.

    5. अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 54.50 टक्के मतदान पार पडले.

    6. अकोला लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 52.49 टक्के एवढं मतदान झालं आहे.  

    7. हिंगोली, लोकसभा मतदार संघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 52.03 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

    8. परभणी लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 53.79 टक्के एवढं मतदान झालं आहे.

  • 04:42 PM • 26 Apr 2024

    दुसऱ्या टप्प्यात 03 वाजेपर्यंत महाराष्ट्रात किती टक्के मतदान?    

    • वर्धा लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 45.95% एवढं मतदान झालं आहे.
    • अमरावती लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 43.76% एवढं मतदान झालं आहे.
    • अकोला लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 42.69% एवढं मतदान झालं आहे.
    • बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 41.66% एवढं मतदान झालं आहे.
    • हिंगोली लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 40.50% एवढं मतदान झालं आहे.
    • नांदेड लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 42.42% एवढं मतदान झालं आहे.
    • परभणी लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 44.49% एवढं मतदान झालं आहे.
    • यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुपारी 03 वाजेपर्यंत एकूण 42.55% एवढं मतदान झालं आहे.
  • 01:51 PM • 26 Apr 2024

    बिग बॉस फेम शिव ठाकरेनेही बजावला मतदानाचा हक्क!

    बिग बॉस हिंदी, तसंच मराठी अशा विविध रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता शिव ठाकरे याने आज मतदानाचा हक्क बजावला आहे. आज महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदान आहे. शिव ठाकरे मुळचा अमरावती जिल्ह्यातला असून त्याने कुटुंबासह मतदान केलं आहे.

  • 01:44 PM • 26 Apr 2024

    सरकारची लंका आता आपल्याला दहन करायची आहे- अमोल कोल्हे

    “तेव्हा रावणाने हनुमानाला शेपटी पेटवतो म्हणून भीती दाखवली होती. तशीच आज सरकारकडून भल्या भल्या नेत्यांना कारवाईची भीती दाखवली जाते. तेव्हा हनुमंत रायाने रावणाची बाजू घेतली नाही, हनुमाची शेपटी रावणाने पेटवली आणि त्याच पेटत्या शेपटीची मशाल करून रावणाची संपूर्ण सोन्याची लंका जाळून टाकली. परंतु आज निष्ठा ठेवली जात नाही. जर निष्ठा ठेवली तर समोरून दबाव टाकणाऱ्यांची लंका दहन झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना, सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारची लंका आता आपल्याला दहन करायची आहे,” असं अमोल कोल्हे म्हणाले.

  • ADVERTISEMENT

  • 11:44 AM • 26 Apr 2024

    दुसऱ्या टप्प्यात 11 वाजेपर्यंत महाराष्ट्रात किती टक्के मतदान?

    1. नांदेड लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 20.85 टक्के एवढं मतदान झालं आहे.

    2. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 17.92 टक्के एवढं मतदान झालं आहे.

    3. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 18.01 टक्के मतदान झाले.

    4. वर्धा लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 18.35 टक्के एवढं मतदान झालं आहे.

    5. अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी 17.73 टक्के मतदान पार पडले.

    6. अकोला लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 17.37 टक्के एवढं मतदान झालं आहे.  

    7. हिंगोली, लोकसभा मतदार संघात सकाळी 11 वाजेपर्यंत 18.19 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

    8. परभणी लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 21.77 टक्के एवढं मतदान झालं आहे.

  • ADVERTISEMENT

  • 11:41 AM • 26 Apr 2024

    नांदेडमधल्या पाळज येथील मतदान केंद्रावर काही मिनिटांचा गोंधळ

    निवडणूक आयोगाचे झोनल अधिकारी मतदान केंद्रावर उपस्थित. एव्हीएममध्ये तांत्रिक अडचण येत असल्याची मतदारांच्या तक्रारीनंतर हालचाली.  सध्या मशीन तपासले जात असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती.
  • 11:40 AM • 26 Apr 2024

    राजश्री पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क    

    शिवसेना उमेदवार राजश्री पाटील मतदानाचा हक्का बजावला. यवतामाळ-वाशिममध्ये राजश्री पाटील यांचे पती हेमंत पाटील यांचे तिकीट कापून राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.    

  • 11:19 AM • 26 Apr 2024

    हनुमान चालिसा वाचून मतदानाला आले- नवनीत राणा

    भाजप उमेदवार नवनीत राणा आणि खासदार रवी राणा हे मतदानासाठी रवाना झाले आहेत. मतदान करण्यापूर्वी आपण सकाळी हनुमान चालिसाचे पठण केल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं. सोबतच घरातील मोठ्यांचा आशीर्वादही घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

  • 11:18 AM • 26 Apr 2024

    मनोज जरांगेंनी बजावला मतदानाचा हक्क; रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर दाखल 

    मनोज जरांगे पाटील यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. रुग्णवाहिकेतून मतदान केंद्रावर जात त्यांनी मतदान केलं.

  • 10:18 AM • 26 Apr 2024

    परभणीत अख्ख्या गावानेच टाकला मतदानावर बहिष्कार!

    परभणीत बलसा खुर्दमध्ये रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. प्रशासनाने आतापर्यंत आमच्यावर लक्ष दिलं नाही मग आम्ही त्यांना मतदान का करायचं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांनी एकत्रित ही भूमिका मांडली आहे. सकाळपासून याठिकाणी एकही मतदान झालेलं नाही आहे. आमची कोणती समस्या सोडवत नाही, राजकीय दखल घेत नाही. 2009 मध्ये ज्यावेळी गावकऱ्यांचं पुर्नवसन झालं होतं त्यानंतर बाहेरील व्यक्तीने गावच्या ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या एका जागेवर अतिक्रमण केलं होतं. तेव्हापासून गावकरी कोर्टात लढत आहेत. कोर्टाचा निकालही गावकऱ्यांच्या बाजूने आहे पण प्रशासन कोणतीही दखल घेत नाही असं तेथील लोकांचं म्हणणं आहे. 
     

  • 09:40 AM • 26 Apr 2024

    पहिल्या दोन तासात कुठे किती झालं मतदान?

    महाराष्ट्रात ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान-

    वर्धा-७.१८
    अकोला-७.१७
    अमरावती-६.३४
    परभणी-९.७२
    यवतमाळ-७.२३
    बुलढाणा-६.६१
    हिंगोली-७.२३
    नांदेड-७.७३

  • 09:07 AM • 26 Apr 2024

    मनोजर जरांगे मतदानासाठी रूग्णवाहिकेतून रवाना

    आज महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यावेळी मराठा समाजासाठी लढणारे मनोजर जरांगे पाटील रूग्नवाहिकेतून रवाना झाले आहेत. काही दिवसांपासून त्यांचे गॅलेक्सी रूग्णालयात उपचार सुरू आहेत अशा परिस्थितीत ते रूग्णवाहिकेतून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघाले आहेत.

  • 08:24 AM • 26 Apr 2024

    अमरावतीच्या दस्तुर नगरमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड!

    अमरावतीच्या दस्तुर नगरमधील संत कवर राम शाळेत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची माहिती आहे. सकाळी 7 वाजल्यापासून ईव्हीएम बंद असल्यानं मतदान थांबलं आहे. 

  • 08:13 AM • 26 Apr 2024

    हिंगोलीत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत

    हिंगोली आज दुसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. या ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी निवडणूक होत आहे. जुने सहकारी असलेले महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर तर महायुतीकडून बाबुराव कदम कोहळीकर एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात आहे.

     

  • 08:10 AM • 26 Apr 2024

    Lok Sabha Election Live : महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात मतदानाला किती प्रतिसाद? पहा लाईव्ह

     

  • 08:08 AM • 26 Apr 2024

    PM Modi : "तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज", मोदींचे मतदारांना आवाहन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

    "लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, आज मतदान होत असलेल्या, मतदारसंघामधील सर्वांना विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. मतदानाचे प्रमाण वाढल्याने आपली लोकशाही बळकट होते. विशेषतः आपल्या युवा आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज", असे आवाहन मोदींनी केले आहे.

     

  • 07:55 AM • 26 Apr 2024

    Maharashtra Lok Sabha Updates : भाजपला 'डीएमके' फॅक्टरची चिंता?

    पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. आता सगळ्यांचं लक्ष दुसऱ्या टप्प्यातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ मतदारसंघांकडे लागले आहे. या मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पण, या मतदारसंघात डीएमके (दलित, मुस्लीम आणि कुणबी मराठा) फॅक्टर निर्णायक ठरताना दिसत आहे.

    संपूर्ण विश्लेषण वाचण्यासाठी क्लिक करा

  • 07:54 AM • 26 Apr 2024

    Maharashtra Lok Sabha Voting Updates : आठ मतदारसंघातील प्रमुख उमेदवार

    बुलढाणा
    शिवसेना (शिंदे गट) - प्रतापराव जाधव
    शिवसेना (ठाकरे गट) - नरेंद्र खेडेकर
    वंचित - वसंत मगर 

    अकोला
    भाजप - अनुप धोत्रे
    काँग्रेस - अभय पाटील 
    वंचित - प्रकाश आंबेडकर

    अमरावती
    भाजप - नवनीत राणा
    काँग्रेस - बळवंत वानखेडे
    प्रहार - दिनेश बूब
    अपक्ष - आनंदराज आंबेडकर (वंचित पाठिंबा)

    वर्धा
    भाजप - रामदास तडस 
    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - अमर काळे 
    वंचित - राजेंद्र साळुंके

    यवतमाळ-वाशिम
    शिवसेना (शिंदे गट) - राजश्री पाटील
    शिवसेना (ठाकरे गट) - संजय देशमुख

    हिंगोली
    शिवसेना (शिंदे गट) - बाबूराव कदम कोहळीकर
    शिवसेना (ठाकरे गट) - नागेश पाटील आष्टीकर
    वंचित - बी. डी. चव्हाण

    नांदेड
    भाजप - प्रतापराव पाटील-चिखलीकर
    काँग्रेस - वसंतराव चव्हाण
    वंचित - अविनाश बोसीकर

    परभणी
    शिवसेना (ठाकरे गट) - संजय (बंडू) जाधव
    रासप - महादेव जानकर (NCP कोट्यातून)
    वंचित - पंजाबराव डख

follow whatsapp

ADVERTISEMENT