Maharashtra Lok Sabha Election : भाजपला 'डीएमके' फॅक्टरची चिंता! कुठे बसू शकतो फटका?
Lok Sabha Election 2024 Maharashtra : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात DMK (दलित, मुस्लीम आणि कुणबी मराठा) हा घटक कसा निर्णायक ठरणार आहे?
ADVERTISEMENT
Lok Sabha Election Maharashtra, Maharashtra Politics : पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. आता सगळ्यांचं लक्ष दुसऱ्या टप्प्यातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या आठ मतदारसंघांकडे लागले आहे. या मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. पण, या मतदारसंघात डीएमके (दलित, मुस्लीम आणि कुणबी मराठा) फॅक्टर निर्णायक ठरताना दिसत आहे. नेमकं कसं ते जाणून घ्या. (How does DMK Dalit Muslim and Kunbi Maratha factor likely to be decisive in second phase of Lok Sabha polls in Maharashtra)
ADVERTISEMENT
या आठ लोकसभा मतदारसंघापैकी पाच जागा पश्चिम विदर्भातील तर तीन जागा मराठवाड्यातील आहेत. मात्र, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ-वाशीम या जागांवर उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकण्यामागे जातीय समीकरणही कारणीभूत आहेत.
हे वाचलं का?
निवडणूक विश्लेषकांच्या मते, खैरलांजी हत्याकांड घटनेचा पश्चिम विदर्भातील दलित मतदारांवर एक दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही मोठा परिणाम अजूनही दिसतो. विशेषत: अमरावती लोकसभा मतदारसंघाची विभागणी बौद्ध आणि बौद्धेतर उमेदवारांच्या धर्तीवर आहे.
नवनीत राणांसाठी लढाई कठीण
अमरावतीच्या जागेवर काँग्रेसने आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते बळवंत वानखेडे यांना नवनीत कौर राणा यांच्या विरोधात उभे केले आहे. राणा या नुकत्याच भाजपमध्ये सामील झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
दुसरीकडे, एनडीएच्या नेतृत्वाखालील महायुतीतील मित्रपक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रतिनिधीत्व करणारे दिनेश बूब यांनी भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ठाकरेंना नको होतं तेच झालं... 'मविआ'तील पहिल्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब!
त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ हे सुद्धा नवनीत राणा यांच्याविरोधात आहेत. ते राणा यांच्या प्रचारापासून दूर आहेत.
मागच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यांच्यासाठी ही निवडणूक कठीण होताना दिसत आहेत. कारण मतदारासंघातील दलित, मुस्लीम आणि कुणबी मते त्यांच्या पारड्यात किती पडतील, हेच निकाल ठरवणार आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात काय?
अकोला मतदारसंघावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे मुस्लिम मतांवर लक्ष ठेवून आहेत. या मतदारसंघातील एकूण मतदारांपैकी सुमारे 20 टक्के मतदार हे मुस्लीम आहेत. या मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील या दोन्ही मराठा उमेदवारांसह तिरंगी लढत आहे.
हेही वाचा >> 'महाराष्ट्रात आम्हाला एवढ्या जागा मिळतील', पवारांनी आकडाच सांगून टाकला!
विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना घराणेशाहीवरून लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. तर अभय पाटील काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या पारंपारिक अल्पसंख्याक मतदारांवर नजर ठेवून आहेत. एमआयएमने या मतदारसंघातून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिला आहे. याचाही परिणाम बघायला मिळू शकतो.
यात महत्त्वाचं म्हणजे डीएमके फॅक्टर म्हणजे दलित, मुस्लीम, कुणबी मराठा या घटकांमध्ये सत्ताविरोधी सूर दिसत आहे. त्यात संविधान बदलणार वगैरे मुद्देही कुठे ना कुठे या मतदारांवर प्रभाव टाकताना दिसत असून, या गोष्टीचा थेट फटका भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो.
कुणबी टक्का जास्त... बुलढाणा, यवतमाळ लोकसभा मतदारसंघात काय?
बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम या दोन जागा अशा आहेत, जिथे शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे सेना विरुद्ध ठाकरे सेना अशी निवडणूक रंगणार आहे.
बुलढाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद प्रमुख आणि उद्धव यांचे निष्ठावंत नरेंद्र खेडेकर यांचे आव्हान आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि वंचित बहुजन आघाडीचे (व्हीबीए) वसंत मगर यांच्या उमेदवारीने ही लढत चौरंगी बनवली आहे.
हेही वाचा >> शिंदे-ठाकरेंच्या जीवाला घोर; 'हा' फॅक्टर ठरवणार औरंगाबादचा खासदार!
बंजारा आणि कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या यवतमाळ-वाशीम या जागेवरून शिवसेनेच्या भावना गवळी या पाच वेळा खासदार राहिल्या आहेत. पण, त्यांना यावेळी तिकीट नाकारण्यात आले.
आता ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात ओबीसी कुणबी उमेदवार (राजश्री पाटील) विरुद्ध मराठा उमेदवार (संजय देशमुख) असे ध्रुवीकरण होताना दिसत आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघ
वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेल्या आणि तीन वेळा आमदार असलेल्या अमर काळे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे. इथे जातीय समीकरणं महत्त्वाची ठरतील असे विश्लेषकांचे मत आहे. एकंदरीत डीएमके फॅक्टरने महायुतीचे टेन्शन वाढवल्याचे चित्र आठपैकी काही मतदारसंघात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT