पत्नीची निर्दयी हत्या अन् मृतदेह ट्रॉली बॅगेत भरून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकला; तपासात धक्कादायक कारण समोर...

मुंबई तक

ट्रॉली बॅगेत एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली होती. आता, या प्रकरणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेच्या पतीनेच तिची निर्दयी हत्या केली असून तिचा मृतदेह ट्रॉली बॅगेत भरून तो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीची निर्दयी हत्या अन्...

point

मृतदेह ट्रॉली बॅगेत भरून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकला

point

तपासात धक्कादायक कारण समोर...

Crime News: बिहारच्या रोहतास येथे ट्रॉली बॅगेत एका महिलेचा मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली होती. आता, या प्रकरणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधाचा विरोध केल्याने महिलेची हत्या करण्यात आली. पीडितेच्या पतीनेच तिची निर्दयी हत्या केली असून तिचा मृतदेह ट्रॉली बॅगेत भरून तो कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून देण्यात आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील मृत महिलेचं नाव मैरून खातून असून रोहतासच्या डेहरी येथील जक्की बिगहा येथील रहिवासी मोहम्मद कयामुद्दीन नावाच्या तरुणाशी तिचा विवाह झाला होता. खरं तर, कयामुद्दीनचे त्याच्या मामीच्या बहिणीसोबत अनैतिक संबंध होते आणि याचा मैरून खातून त्याचा विरोध करायची. याच कारणावरून दोघांमध्ये बऱ्यादा भांडणे व्हायची. 

पीडितेच्या कुटुंबियांनी याबाबत सांगितलं की, काल रात्री फोन आल्यानंतर ते तिच्या आई-वडिलांच्या घरी तिची वाट पाहत होते. दरम्यान, त्यांना ट्रॉली बॅगमधून तिचा मृतदेह सापडल्याची बातमी मिळाली. मृताच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं की मैरुनचे 2022 मध्ये डेहरी येथे लग्न झालं होतं. त्यावेळी जावयाने फोन करून त्यांची मुलगी पळून गेल्याचे सांगितलं आणि तेव्हा त्या दोघांमध्ये नेहमीप्रमाणे भांडण झालं असेल असं कुटुंबियांनी गृहीत धरलं. घरातील सगळे तिची वाट पाहत होते, परंतु नंतर धक्कादायक माहिती समोर आली. मृत महिलेच्या आईने केलेल्या आरोपानुसार, जावयानेच तिच्या मुलीची हत्या केली. 

हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईत हक्काचं घर घेण्याची संधी! तब्बल 120 घरांसाठी म्हाडाची लॉटरी; 5 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु...

रविवारी, डेहरी नगर पोलीस स्टेशन परिसरातील स्टेशन रोडवरील भाजी मार्केटजवळ एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. खरं तर, सकाळच्या सुमारास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लाल ट्रॉली बॅग आढळल्याने स्थानिकांना त्यात काहीतरी गडबड जाणवली. त्यांनी आरडाओरडा केला आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर डेहरी पोलीस स्टेशनचे प्रभारी संजय त्रिपाठी पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, एफएसएल टीमसुद्धा घटनास्थळी पोहोचली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp