मुलीने रॅपिडो बुक केली; रस्त्यात चालकाने केला बलात्कार, नेमकं काय घडलं?
Crime News : एका रॅपिडो बाईक चालकाने खरेदीसाठी निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेला कपडे खरेदी करण्यासाठी जायचे होते. त्यासाठी तिने रॅपिडो बुक केली. मात्र रॅपिडो चालकाने दाखवलेल्या स्वस्त कपड्यांच्या अमिषाला ती बळी पडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलीने रॅपिडो बुक केली
रस्त्यात चालकाने केला बलात्कार
Crime News : एका रॅपिडो बाईक चालकाने खरेदीसाठी निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेला कपडे खरेदी करण्यासाठी जायचे होते. त्यासाठी तिने रॅपिडो बुक केली. मात्र रॅपिडो चालकाने दाखवलेल्या स्वस्त कपड्यांच्या अमिषाला ती बळी पडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली असून महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मध्यप्रदेशातील इंदोरच्या राजवाडा परिसरातील ही घटना आहे.
हे ही वाचा : 'तू हिंदूच राहशील म्हणून लग्न केलं, नंतर रीताला जबरदस्तीने सादिया बनवलं; दुसरी बायकोही घरी आणली
स्वस्त कपड्यांच्या अमिषाला बळी पडली
पीडित मुलीने राजवाडा येथे खरेदीसाठी जाण्याकरिता मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे 'रॅपिडो' बाईक बुक केली होती. आरोपी चालक तिला राजवाडा येथे घेऊन गेला. मात्र त्याठिकाणी जाऊन त्याने तिला स्वस्त कपड्यांचे अमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास ठेऊन ती सोबत गेली. मात्र इथंच ती फसली. तिच्यासोबत काही भयंकर होणार आहे याची कल्पनाही तिला आली नव्हती.
खोलीवर नेऊन केले लैंगिक अत्याचार
आरोपी चालक पीडितेला राजवाडा येथून परदेशपुरा या भागातील त्याच्या खोलीवर घेऊन गेला. तिथे आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने तात्काळ रावजी बाजार पोलीस गाठून तक्रार नोंदवली.










