'तू हिंदूच राहशील म्हणून लग्न केलं, नंतर रीताला जबरदस्तीने सादिया बनवलं; दुसरी बायकोही घरी आणली

मुंबई तक

Crime News : मात्र, लग्नानंतर काही काळातच परवेजच्या वागण्यात मोठा बदल झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे. रीता सांगते की तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी मानसिक तसेच शारीरिक दबाव टाकण्यात येऊ लागला. धर्मांतर न केल्यास घटस्फोट देण्याची धमकीही दिली गेली. संसार वाचवण्यासाठी आणि नातं टिकवण्यासाठी अखेर रीता हिने इस्लाम स्वीकारला आणि तिचे नाव ‘सादिया तबस्सुम’ ठेवण्यात आले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'तू हिंदूच राहशील म्हणून लग्न केलं,

point

नंतर रीताला जबरदस्तीने सादिया बनवलं; दुसरी बायकोही घरी आणली

Crime News Marathi , बंगळुरू : प्रेमाच्या नावाखाली एका तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा धक्कादायक प्रकार कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे उघडकीस आला आहे. कुटुंब, समाज आणि स्वतःचा धर्म त्यागून प्रेमासाठी सर्वस्व दिलेल्या एका हिंदू तरुणीला अखेर न्यायासाठी पोलिसांच्या दारात धाव घ्यावी लागत आहे. रीता (नाव बदललेले), जी धर्मांतरानंतर ‘सादिया तबस्सुम’ म्हणून ओळखली जाऊ लागली, हिने प्रेमाच्या नावाखाली फसवणूक, जबरदस्तीने धर्मांतर आणि नंतर परित्याग झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

ही घटना सन 2015 पासून सुरू झाली. डीजे हल्ली परिसरात राहणारी रीता ही कॉलेजमध्ये पीयूसीचे शिक्षण घेत असताना तिची ओळख परवेज या तरुणाशी झाली. ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. रीता सांगते की परवेजने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. मात्र, विवाहाचा विषय पुढे येताच तिच्या कुटुंबीयांनी धर्म वेगळा असल्याने या नात्याला तीव्र विरोध केला. अशा प्रकारची नाती भविष्यात टिकत नाहीत, असा कुटुंबीयांचा ठाम आक्षेप होता. त्या वेळी फरवेजने रीता आणि तिच्या कुटुंबीयांना विश्वास दिला की तो कधीही तिला धर्म बदलण्यास भाग पाडणार नाही. लग्नानंतरही ती हिंदू धर्मातच राहील, असे त्याने स्पष्ट आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवत अखेर 15 डिसेंबर 2019 रोजी दोघांचा विवाह पार पडला.

हेही वाचा : अजितदादांच्या अंत्यसंस्कारादरम्यान 20 लाख रुपयांचे दागिने चोरीला, बारामती पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मात्र, लग्नानंतर काही काळातच परवेजच्या वागण्यात मोठा बदल झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे. रीता सांगते की तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी मानसिक तसेच शारीरिक दबाव टाकण्यात येऊ लागला. धर्मांतर न केल्यास घटस्फोट देण्याची धमकीही दिली गेली. संसार वाचवण्यासाठी आणि नातं टिकवण्यासाठी अखेर रीता हिने इस्लाम स्वीकारला आणि तिचे नाव ‘सादिया तबस्सुम’ ठेवण्यात आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp