आई-वडिलांचा वाद; अल्पवयीन मुलाचा विळ्याने गळा चिरला, नराधम बाप कुठं लपला?
Crime News : पती-पत्नीच्या वादात एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बापानेच आपल्या 12 वर्षीय मुलाचा विळ्याने गळा चिरुन खून केला. यानंतर मुलाचा मृतदेह एका पेटीत लपवून तो फरार झाला. मुलाची आई घरी आली तेव्हा तिला घरभर रक्ताचे डाग दिसले. तिने ताबडतोब पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली.
ADVERTISEMENT

Crime News : पती-पत्नीच्या वादात एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारुच्या आहारी गेलेल्या बापानेच आपल्या 12 वर्षीय मुलाचा विळ्याने गळा चिरुन खून केला. यानंतर मुलाचा मृतदेह एका पेटीत लपवून तो फरार झाला. मुलाची आई घरी आली तेव्हा तिला घरभर रक्ताचे डाग दिसले. तिने ताबडतोब पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. माणुसकीला काळिमा फासणारा हा प्रकार उत्तरप्रदेशातील फिरोजाबादमधील आहे.
हे ही वाचा : आधी तिन्ही मुलांना फासावर लटकवलं आणि नंतर आईने प्यायलं डीझेल... नेमकं काय घडलं?
विळ्याने गळा चिरुन मुलाला संपवले
फिरोजाबाद परिसरातील मक्खनपूर भागातील ही घटना आहे. राजेश लोधी हा आपली पत्नी उर्मिला आणि दोन मुलांसह राहत होता. मयंक(12) आणि महिमा(14) अशी त्यांच्या दोन मुलांची नावं आहेत. राजेशला दारुचे व्यसन असून गेल्या 12 वर्षांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरु होते. उर्मिला एका खाजगी शाळेत शिक्षिका आहे. घटनेच्या दिवशी ती शाळेत गेली होती. तर मुलगी महिमा क्लाससाठी गेली होती. ही संधी साधून आरोपी राजेश याने आपल्या मुलाला संपवलं. राजेशने विळ्याने मयंकच्या चेहरा आणि मानेवर सपासप वार करुन त्याचा निर्घृण खून केला. त्यानंतर मुलाचा मृतदेह घरातील एका पेटीत कपड्यांच्या खाली दडवून तो तिथून पसार झाला.
उर्मिलाच्या माहेरच्या मंडळींनी केला राडा
दुपारी दोनच्या सुमारास उर्मिला शाळेतून घरी परतली, तेव्हा तिला घरभर रक्ताचे डाग दिसले. मुलगा मयंक कुठेही दिसत नसल्याने तिने तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तीन तास कसून शोध घेतला असता, पेटीमध्ये कपड्यांच्या खाली मयंकचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला. दरम्यान, मयंकच्या हत्येची बातमी समजताच उर्मिलाच्या माहेरच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी राजेशचे वडील आणि इतर नातेवाईक मुलाच्या हत्येनंतर तिथे आले नाहीत, यामुळे संतप्त झालेल्या मंडळींनी राजेशच्या वडिलोपार्जित घरावर जाऊन जोरदार राडा केला आणि घराची तोडफोड केली.
