पुणे : कौटुंबिक वादातून नवऱ्याने बायकोची केली निर्घृण हत्या, नातेवाईकांकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
pune crime : घरगुती वादातून पतीकडूनच पत्नीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला. पतीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पत्नीला चक्कर येऊन ती पडल्याचे भासवण्यात आले, नातेवाईकांनी घटनास्थळी पडलेल्या रक्ताचा सडा पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा तपास निष्पन्न झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवरा तुषार आणि बायको वैष्णवी यांच्यात वाद
घरगुती वादातून पतीकडूनच पत्नीची हत्या
Pune Crime : घरगुती वादातून पतीकडूनच पत्नीची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला. पतीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पत्नीला चक्कर येऊन ती पडल्याचे कारण सांगितलं, नातेवाईकांनी घटनास्थळी पडलेल्या रक्ताचा सडा पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पतीचं नाव तुषार उर्फ गणेश विलास तुपसुंदर (वय 28) असे आहे. तर पत्नीचं नाव वैष्णवी तुषार तुपसुंदर (वय 23) असे आहे.
हे ही वाचा : शरद पवार गटाने सुनेत्राताईंचं नेतृत्व स्वीकारुन विलिनीकरण करावं; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
संबंधित प्रकरणात शेजारी राहणाऱ्या काही मंडळींनी महिलेला ससून रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी सखोल तपास करत हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट केले. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
नवरा तुषार आणि बायको वैष्णवी यांच्यात वाद
या प्रकरणात पुरावे नष्ट करण्यासाठी मदत करणारे आरोपी मनोज रोहिदास कांबळे (वय 39) आणि वनिता मनोज कांबळे (वय 32) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार आणि वैष्णवी यांच्यात सतत वाद व्हायचे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याच जोराचा वाद उफळला होता.
मनोज आणि वनिता कांबळे यांनी घरातील फरशीवरील सांडलेले रक्त पुसलं
दरम्यान आरोपी तुषारचे नातेवाईक मनोज आणि वनिता कांबळे यांनी घरातील फरशीवर सांडलेले रक्ताचे डाग पुसले. मनोज कांबळे हा दरवाज्यात उभा राहून कोण येरझारा मारतंय का याकडे लक्ष ठेवून होता.










