उद्धव ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंनी घेतली प्रचार सभा, राज्यात मोठ्या घडामोडी; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde held a campaign meeting for Uddhav Thackeray MLA Dilip Sopal : यावेळी एकनाथ शिंदेंनी वैराग तालुका निर्मिती आणि संतनाथ कारखाना सुरु करण्याचा आश्वासनही दिलं. स्थानिक विकासकामांना निधी देण्याचा वादा देखील केला. सोपल यांच्या नेतृत्वात उभारलेल्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना केलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
उद्धव ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंनी घेतली प्रचार सभा
राज्यात मोठ्या घडामोडी; नेमकं काय घडलं?
Eknath Shinde held a campaign meeting for Uddhav Thackeray MLA Dilip Sopal : राज्याच्या राजकारणात दोन्ही शिवसेनेमध्ये किती हाडवैर आहे? हे आपण नेत्यांच्या वक्तव्यांतून पाहातच असतो. मात्र, सोलापुरातील बार्शी तालुक्यात उद्धव ठाकरेंच्या आमदारासाठी चक्क उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रचार सभा घेतलीये. बार्शीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी स्थानिक पातळीवर वेगळी समीकरणं जुळवली आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी दिलीप सोपल यांनी शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आणलेली पाहायला मिळाली होती. विशेष म्हणजे, या युतीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनीही पाठिंबा दिला आहे. दिलीप सोपलांनी या निवडणुकीत मशाल, धनुष्यबाण आणि घड्याळ या तिन्ही चिन्हावर लढणारे उमेदवार एकत्र करुन महाआघाडी तयार केलीये. याच उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैराग येथे प्रचार सभा घेतली. यावेळी एकनाथ शिंदे काय म्हणाले? पाहूयात...
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
एकनाथ शिंदे म्हणाले, दिलीप सोपल सात वेळेस निवडून आले. या विधानसभेला गाडी चुकली. नाहीतर ते मंत्रिमंडळात असले असते. त्यांचं विधानसभेतलं काम मी पाहिलेलं आहे. मी जवळून सोपल यांना अनुभवलंय. दोन वेळेस ते विधानसभेत नव्हते. पण त्यावेळेस विधानसभेलाही चुकल्यासारखं वाटायचं. सोपल हे अजातशत्रू आहेत, सगळ्यांचा मित्र आहे. आमदार कसा असावा? तर दिलीप सोपल यांचं नाव घ्यावं लागेल. अनुभवी आणि कलाकार माणूस आहे. म्हणून मी मुद्दाम या सभेला आलो. शेवटी आज एकीकडे दु:खाचं सावट आपल्यावर आहे. अजितदादांचं निधन झालं. महाराष्ट्रात शोककळा आहे आणि निवडणूक आहे. आमच्या निवडणुका झाल्या. ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कार्यकर्त्यांची अपेक्षा असते, नेत्याने आमच्यासाठी देखील यावं. मी त्यांच्या पाठिशी उभा राहणारा कार्यकर्ता आहे. दिलीप सोपल साहेब आणि माझी मैत्री जीवाभावाची आहे, त्यामुळेच मी इथं आलोय.
पुढील काळात चूक दुरुस्त करुन सोपल 8 व्यांदा निवडून येतील, शिदेंकडून थेट ऑफर
यावेळी एकनाथ शिंदेंनी वैराग तालुका निर्मिती आणि संतनाथ कारखाना सुरु करण्याचा आश्वासनही दिलं. स्थानिक विकासकामांना निधी देण्याचा वादा देखील केला. सोपल यांच्या नेतृत्वात उभारलेल्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. शिवाय, एकनाथ शिंदेंनी दिलीप सोपलांना पुढील निवडणूक आमच्याकडून लढवण्याची ऑफर देखील दिली. आता सोपल पुढील काळात आठव्यांदा निवडून येतील. 100 टक्के निवडून येतील. मागच्या वेळेस झालेली चूक आपण दुरुस्त करु, असंही शिंदे यावेळी म्हणाले.










