"सावळा रंग आणि शारीरिक संबंध सुद्धा..." लग्नानंतर एका महिन्यातच बायकोने नको ती कारणे सांगून नवऱ्याला सोडलं!

मुंबई तक

लग्नाच्या अवघ्या एक महिन्यानंतर एका महिलेने तिच्या पतीसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला. तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्या पतीविरुद्ध तक्रारी केल्या आणि पतीपासून वेगळं होण्याचाच आग्रह धरला.

ADVERTISEMENT

बायकोने नको ती कारणे सांगून नवऱ्याला सोडलं!
बायकोने नको ती कारणे सांगून नवऱ्याला सोडलं!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"सावळा रंग आणि शारीरिक संबंध सुद्धा..."

point

एका महिन्यातच बायकोने नको ती कारणे सांगून नवऱ्याला सोडलं!

Crime News: उत्तर प्रदेशातील हाथरस येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या एक महिन्यानंतर एका महिलेने तिच्या पतीसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला. तिने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्या पतीविरुद्ध तक्रारी केल्या आणि पतीपासून वेगळं होण्याचाच आग्रह धरला.

संबंधित प्रकरण हे हाथरसच्या कैलाश नगर बस्तीतील असून या घटनेने सामाजिक चर्चांना उधाण आलं आहे. आग्र्यातील रहिवासी असलेल्या एका तरुणीने एक महिन्यापूर्वीच हाथरसमध्ये राहणाऱ्या तरुणासोबत लग्न केलं होतं. मात्र, लग्न झाल्यानंतर एका महिन्यातच तिने आपल्या पतीला सोडण्याचा निर्णय घेतला. महिलेने त्याच्यासोबत न राहण्यासाठी बरीच कारणे पोलिसांना सांगितली. 

शारीरिक संबंधाबाबत संतुष्ट नव्हती 

महिलेने केलेल्या आरोपानुसार, ती तिच्या पतीसोबतच्या शारीरिक संबंधाबाबत संतुष्ट नव्हती. तिने कॅमेऱ्यासमोर सांगितलं की तिला बऱ्याच वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे हे नातं पुढे न्यायचं नाही. रिपोर्ट्सनुसार, तिला तिच्या पतीचा काळा रंग सुद्धा आवडत नव्हता. दरम्यान, तिने स्पष्ट केलं की तिला कायदेशीर कारवाईला सामोरे जायचं नाही आणि ती पोलीस स्टेशनमध्ये तडजोड करून हे नातं संपवू इच्छित आहे. 

हे ही वाचा: 'तो' नग्नावस्थेतील मृतदेह मुंबईच्या महिलेचा; गोरखपूरमध्ये झाली होती हत्या, कसा झाला उलगडा?

पतीने काय सांगितलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, हाथरसच्या कैलाश नगर येथील रहिवासी असलेला पती हा एका बेकरीमध्ये काम करत होता. त्याने आपली खरी परिस्थिती सांगितली. तो म्हणाला की हे लग्न परस्पर सहमतीने झाले होतं आणि लग्नापूर्वी तो तिच्या पत्नीला खूप आवडला होता. पण, अचानक तिच्या वागण्यात असा बदल का झाला? हे त्याला कळत नाही. तो म्हणाला की लग्नात अडीच ते तीन लाख रुपये खर्च आला आणि आता, लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तो खूप दुःखी आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही पक्षांना समजावण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले, परंतु ती महिला तिच्या निर्णयावर ठाम राहिली. शेवटी, तिने तिच्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

हे वाचलं का?

    follow whatsapp