'तो' नग्नावस्थेतील मृतदेह मुंबईच्या महिलेचा; गोरखपूरमध्ये झाली होती हत्या, कसा झाला उलगडा?
Crime news : काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये एका महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह पोलिसांना सापडला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. खून करुन चेहरा पूर्णपणे विद्रूप करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास पूर्ण केला असून खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मृत महिला ही मुंबईची असून प्रिया शेट्टी असं तिचं नाव आहे. लव्ह ट्रॅगलमधून हा खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'तो' नग्नावस्थेतील मृतदेह मुंबईच्या महिलेचा
गोरखपूरमध्ये झाली होती हत्या
Crime news : काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील गोरखपूरमध्ये एका महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह पोलिसांना सापडला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. खून करुन चेहरा पूर्णपणे विद्रूप करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास पूर्ण केला असून खून करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मृत महिला ही मुंबईची असून प्रिया शेट्टी असं तिचं नाव आहे. लव्ह ट्रॅगलमधून हा खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. प्रिया मुंबईतून गोरखपूरला का आली आणि तिचा खून कोणी केला, जाणून घेऊया.
हे ही वाचा : शाळेतील विद्यार्थ्यांचा आठवीतील विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; दोन महिन्यांनंतर पोटात दुखू लागले अन्...
प्रियाचे लिव्ह-इन रिलेशन
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली 2012 मध्ये. गोरखपूरचा असलेला विजय साहनी एका खाजगी विमा कंपनीत नोकरीसाठी मुंबईला आला होता. याठिकाणी त्याची ओळख प्रिया शेट्टी हिच्याशी झाली. दोघांमध्ये ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी एकत्र घर घेतले आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. या दरम्यान दोघांनी एका मंदिरात लग्नही केले. प्रियाने एका मुलाला जन्मही दिला, ज्याचे वय सध्या 13 वर्ष असल्याची माहिती आहे.










