राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंची लोकसभेत जीभ घसरली.. म्हणाले, 'नेहरू अय्याशी...'

मुंबई तक

Nishikant Dubey: भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत भाषण करताना माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंविरोधात अत्यंत वादग्रस्त विधान केलं आहे. पाहा दुबे नेमकं काय म्हणाले.

ADVERTISEMENT

bjp mp nishikant dubey who challenged raj thackeray made an inappropriate remark in lok sabha saying nehru was indulging in debauchery
भाजप खासदार निशिकांत दुबेंची लोकसभेत जीभ घसरली (फोटो सौजन्य: संसद टीव्ही)
social share
google news

नवी दिल्ली: भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काही महिन्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देत नव्या वादाला फोडणी दिली होती. ज्यानंतर राज ठाकरेंनी देखील त्यांच्या जाहीर सभांमधून निशिकांत दुबेंवर जोरदार टीका केली होती. त्याच निशिकांत दुबेंनी आज (4 फेब्रुवारी) लोकसभेत बोलताना माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि गांधी कुटुंबाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. ते म्हणाले की, ''राहुल गांधींनी एका अप्रकाशित पुस्तकावर तीन दिवस संसदेला ओलीस ठेवले आहे. पण राहुल गांधींच्या एका पुस्तकाऐवजी मी 100 पुस्तके घेऊन संसदेत आलो आहे. नेहरू-गांधी कुटुंबाच्या फसवणुकीचा इतिहास देशासमोर उघड केला पाहिजे."

भाजप खासदार निशिकांत दुबे यांचं लोकसभेत वादग्रस्त विधान

निशिकांत दुबे म्हणाले, 'इथे पुस्तकावर चर्चा सुरू आहे.. एका पुस्तकावर चर्चा सुरू आहे. असं पुस्तक जे आजपर्यंत छापलंच गेलं नाही. मी तुमच्या माध्यमातून सभागृहाला त्या पुस्तकांबाबत सांगू इच्छितो जो नेहरू कुटुंबीय, काँग्रेस कुटुंबीयांच्या गद्दारी, मक्कारी.. भ्रष्टाचार आणि अय्याशीने भरलेलं आहे. ही सगळी पुस्तकं छापलेली आहेत.'

हे ही वाचा>> महाराष्ट्रातल्या 'या' खासदाराला लोकसभेतून केलं निलंबित, राहुल गांधींसाठी सत्ताधाऱ्यांना भिडणारा तो खासदार कोण?

'पहिलं पुस्तक हे आहे.. एडविना अँड नेहरू.. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तर कशा पद्धतीने पाकिस्तानची फाळणी झाली आणि कशा प्रकारे भारताचे पहिले पंतप्रधान अय्याशी करत होते हे या पुस्तकात आहे. मी त्याचा उल्लेख करू इच्छितो.'

राहुल गांधीजी, तुम्ही गेल्या तीन दिवसांपासून एका अप्रकाशित पुस्तकावर संसदेला ओलीस ठेवले आहे. काही प्रकाशित पुस्तकांवरही सभागृहात चर्चा झाली पाहिजे. गांधी-नेहरू कुटुंबाचा इतिहास खोटेपणा, कपट, भ्रष्टाचार आणि देश तोडणाऱ्यांचा आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp