Nilesh Lanke : ''सुजय विखेंना पैशांची मस्ती, गरीब उमेदवाराची...'' निलेश लंकेंचा पलटवार
Nilesh Lanke reply Sujay vikhe patil : विखेंच्या या आव्हानाला आता निलेश लंके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुजय विखे श्रीमंत कुटुंबातील आहेत. ते माझ्यासारख्या गरीब उमेदवाराची टिंगल करताय. त्यांना पैशांची मस्ती आहे, असा पलटवार लंकेंनी विखेवर केला आहे.
ADVERTISEMENT
Nilesh Lanke reply Sujay vikhe patil : अहमदनगर लोकसभा मतदार संघात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरूवात झाली आहे. त्यात निलेश लंके यांनी माझ्याएवढे इंग्रजी बोलून दाखवावे, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे आव्हान महायुतीचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी (Sujay Vikhe) दिले होते. विखेंच्या या आव्हानाला आता निलेश लंके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुजय विखे श्रीमंत कुटुंबातील आहेत. ते माझ्यासारख्या गरीब उमेदवाराची टिंगल करताय. त्यांना पैशांची मस्ती आहे, असा पलटवार लंकेंनी (Nilesh Lanke) विखेवर केला आहे. (nilesh lanke reply sujay vikhe patil on english speaking challenge ahmednagar lok sabha election 2024)
सुजय विखेंनी इंग्रजी बोलण्यावरून दिलेल्या आव्हानावर बोलताना निलेश लंके म्हणाले, समोरच्या उमेदवाराकडे पैशाची मस्ती आहे. एका बाजुला सांगायचं की जे सक्षम आहेत त्यांनीच राजकारण करायचं, दुसरीकडे सांगायचं निलेश लंकेला इंग्रजी बोलता येत नाही. पण मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मालो आलो आहे. त्यामुळे मी इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकलो नाही.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : शिंदेंनी तिकीट कापल्यानंतर भावना गवळींचा मोठा निर्णय, उमेदवारी अर्ज...
भाषेचा राजकारणात काही संबंध नाही. आपल्या मातृभाषेत आपण संसदेत प्रश्न मांडू शकतो. पण तुमचं अपयश झाकून ठेवण्यासाठी बालिश मुद्दा काढायचा, विकासावर काहीच बोलायच नाही, असा टोला निलेश लंके यांनी विखेंना लगावला.
निलेश लंके काय म्हणाले होते?
निलेश लंकेंनी पाठांतर करून का होईना. माझ्याएवढे इंग्रजी बोलून दाखवावे, भलेही महिनाभर वेळ घेऊन पाठ करून बोलून दाखवावे, मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे आव्हान अहमदनगर लोकसभेचे उमेदवार सुजय विखेंनी दिलं होतं.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Devendra Fadnavis : ''धोत्रेंच्या पाठीशी महायुती, पवार साहेब सुद्धा...'',
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT