Lok Sabha Election 2024 : शिंदेंनी तिकीट कापल्यानंतर भावना गवळींचा मोठा निर्णय, उमेदवारी अर्ज...
Yavatmal washim Lok Sabha Election 2024, Bhavana Gawali : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून भावना गवळी यांचा पत्ता कट होईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सूरू होती. त्यामुळेच भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरूवात केली होती. अगदी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला देखील त्या गेल्या होत्या.
ADVERTISEMENT
Yavatmal washim Lok Sabha Election 2024, Bhavana Gawali : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदार संघातून पाच टर्मच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांच तिकीट कापलं गेलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तिकीट कापल्यानंतर आता भावना गवळी नेमकी काय भुमिका घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (lok sabha election 2024 cm eknath shinde cutting bhavana gavali ticket file nomination form rajashri patil candidate yavatmal washim lok sabha)
ADVERTISEMENT
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून भावना गवळी यांचा पत्ता कट होईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सूरू होती. त्यामुळेच भावना गवळी यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरूवात केली होती. अगदी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला देखील त्या गेल्या होत्या. मात्र या भेटीगाठीनंतरही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच तिकीटं कापलं आहे. आणि भावना गवळी यांच्याऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भावना गवळी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार का? याकडे आता संपुर्ण राजकारणाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा : सेनेमुळे कापावं लागलेलं सोमय्यांचं तिकीट, आता BJP मुळे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिकीट कापल्यानंतर भावना गवळी यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. मी यवतमाळ-वाशिमची उमेदवारी अद्याप सोडलेली नाही. मी माझ्या मतदारसंघामध्ये परत जात आहे. मी यवतमाळ-वाशिममधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असे भावना गवळी यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
त्यामुळे आता भावना गवळी यवतमाळ-वाशिम मतदार संघामधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उद्या अर्ज भरण्याा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर भावना गवळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यास महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
हे ही वाचा : Devendra Fadnavis : ''धोत्रेंच्या पाठीशी महायुती, पवार साहेब सुद्धा...'',
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT