पुणे: "आय मिस यू दिव्यांशी..." फेसबूक लाइव्ह करत तरुणाने संपवलं जीवन! 'त्या' कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल
पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. तरुणाने फेसबूक लाइव्ह करत आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटना ही भोसरी परिसरात घडली असून केशरी प्रसाद शाहू अशी मृत तरुणाची ओळख समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फेसबूक लाइव्ह करत तरुणाने संपवलं जीवन!
'या' कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल
पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime: पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नी आणि मुलगी घर सोडू गेल्यामुळे तरुणाने मानसिक तणावात आपलं आयुष्य संपवल्याचं वृत्त आहे. पीडित तरुणाने फेसबूक लाइव्ह करत आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित घटना ही भोसरी परिसरात घडली असून केशरी प्रसाद शाहू अशी मृत तरुणाची ओळख समोर आली आहे.
गुरुवारी (5 जानेवारी) दुपारी जवळपास 4:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून भोसरी येथील भाजी मार्केटच्या दुसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरून उडी मारून केशरी प्रसाद शाहू यांनी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पीडित तरुणाने फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून आपलं दु:ख व्यक्त केलं. लाइव्ह व्हिडीओमध्ये तो रडताना दिसून येत आहे. "मला माझ्या पत्नीला भेटायचं आहे, मला माझं जीव जगायचं आहे." असं देखील तो व्हिडीओमध्ये म्हणत असल्याचं पाहायला मिळतंय.
फेसबूक लाइव्ह करत आत्महत्या
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, स्वत:ला संपवण्याच्या आधी पीडित तरुणाने तीन पानांची सुसाइड नोटसुद्धा लिहिली होती. यामध्ये, त्याचं त्याच्या मुलीवरचं प्रेम सुद्धा स्पष्ट झालं. कारण, त्याने त्या नोटमध्ये कित्येक वेळा लिहिलं की, "मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो." मिळालेल्या माहितीनुसार, मृताची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यासोबत राहत नव्हती. ती त्यांच्या मुलीला सोबत घेऊन घर सोडून गेली होती. या कौटुंबिक वादामुळे केशरी प्रचंड मानसिक तणावात होता. काल दुपारी तो इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचला आणि तिथल्या पाण्याच्या टाकीवर चढला. त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याचा पोलिसांना संशय आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुमारे एक मिनिट सहा सेकंद फेसबुक लाईव्ह केलं.
हे ही वाचा: शुक्र ग्रहाने नक्षत्र बदललं; आता 'या' राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ सुरू... कारकिर्दीत लक्षणीय प्रगती
संबंधित घटनेची माहिती मिळताच, भोसरी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आली. सुमारे अर्धा तास पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कोणाचंही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. अखेर, तरुणाने दुसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरून उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून आत्महत्येपूर्वी करण्यात आलेलं फेसबूक लाइव्ह व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.










