वनऔषधी शोधताना दरीत कोसळले, कमलगिरी महाराजांचा दुर्दैवी अंत; छत्रपती संभाजीनगर हळहळलं

मुंबई तक

Chhatrapati Sambhajinagar News : कमलगिरी महाराज हे श्री कमलगिरी मठ देवस्थान विश्वस्त मंडळाचे सदस्य होते. त्यांचा मठ जटवाडा रोडवरील हरिओमनगर येथील प्लॉट क्रमांक 28 येथे आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास ते सिल्लोडमधील केळगाव येथील श्री क्षेत्र मुर्डेश्वरपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील मुर्डेश्वर डोंगरावर गेले होते. तेथे वनौषधी शोधत असताना पाय घसरून ते दरीत कोसळले. या अपघातात त्यांच्या हात-पायांसह संपूर्ण शरीराला गंभीर दुखापत झाली होती.

ADVERTISEMENT

Chhatrapati Sambhajinagar News
Chhatrapati Sambhajinagar News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वनऔषधी शोधताना दोनशे फूट दरीत कोसळून महाराजांचा मृत्यू

point

सिल्लोड तालुक्यातील केळगावची घटना; सात तासांच्या बचाव प्रयत्नांना आले नाही यश

Chhatrapati Sambhajinagar News : सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे आयुर्वेदिक वनस्पतींच्या शोधात गेलेले राजू बाबूराव राजगुरे ऊर्फ कमलगिरी महाराज (वय 58) गुरुवारी सकाळी मुर्डेश्वर डोंगरावरून सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळले. गंभीर जखमी झालेल्या महाराजांच्या बचाव कार्य व उपचारास विलंब झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

वनौषधी शोधत असताना पाय घसरून दरीत कोसळले

कमलगिरी महाराज हे श्री कमलगिरी मठ देवस्थान विश्वस्त मंडळाचे सदस्य होते. त्यांचा मठ जटवाडा रोडवरील हरिओमनगर येथील प्लॉट क्रमांक 28 येथे आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास ते सिल्लोडमधील केळगाव येथील श्री क्षेत्र मुर्डेश्वरपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील मुर्डेश्वर डोंगरावर गेले होते. तेथे वनौषधी शोधत असताना पाय घसरून ते दरीत कोसळले. या अपघातात त्यांच्या हात-पायांसह संपूर्ण शरीराला गंभीर दुखापत झाली होती.

हेही वाचा : अजित पवारांच्या निधनापूर्वीचा शेवटचा Video आला समोर, कोणी समोर आणला तो व्हिडिओ?

घटनेची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली. मात्र, दुर्गम व अवघड भूभागामुळे बचावकार्यास विलंब झाला. मुर्डेश्वर येथील एकनाथ कोठाळे, समाधान कोठाळे व सीताराम इवरे यांनी मदतीसाठी दरीत उतरून प्रयत्न केले. महाराज गंभीर जखमी असले तरी काही काळ शुद्धीत होते. दरीत अडकून असताना त्यांनी सुमारे दोन लिटर पाणी प्यायले; मात्र गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp