Lok Sabha Election 2024: शिवसेनेमुळे भाजपला कापावं लागलेलं सोमय्यांचं तिकीट, आता BJP मुळे शिंदेंच्या शिवसेनेला...

रोहित गोळे

BJP vs Shiv Sena: भाजपच्या वाढत्या दबावामुळे एकनाथ शिंदेंना त्यांच्यासोबत आलेल्या खासदारांना उमेदवारी नाकारावी लागत आहे. पण 2019 साली उद्धव ठाकरेंच्या दबावामुळे भाजपला किरीट सोमय्यांना उमेदवारी नाकारावी लागलेली.

ADVERTISEMENT

BJP मुळे शिंदेंच्या शिवसेनेला चार खासदारांचं कापाव लागलं तिकीट
BJP मुळे शिंदेंच्या शिवसेनेला चार खासदारांचं कापाव लागलं तिकीट
social share
google news

Lok Sabha Election BJP, Shiv Sena: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्रात भाजप खूपच आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण महायुतीमध्ये भाजप प्रचंड प्रबळ असून त्यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना उमेदवार द्यावे लागत आहेत किंवा बदलावे लागत आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ.. (lok sabha election 2024 due to pressure from uddhav thackeray bjp had to reject kirit somayya candidacy in 2019 now because of bjp shinde shiv sena has rejected ticket of four current mp)

भाजपचा दवाब, शिंदेंनी जाहीर केलेला उमेदवारच बदलला.. 

शिंदेंच्या शिवसेनेने पहिली यादी जाहीर करताना हिंगोलीतून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाच उमेदवारी दिली होती. मात्र, हेमंत पाटलांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तीव्र विरोध केल्याने आता शिंदेंवर त्यांचं तिकीट कापण्याची नामुष्की ओढावली आहे. 

भाजपचा वाढता दवाब यामुळे एकनाथ शिंदेंना उमेदवारच बदलावा लागला आहे. पहिली यादी जाहीर करताना शिंदेंच्या शिवसेने हिंगोलीतून हेमंत पाटलांना तिकीट जाहीर केलं होतं. पण आज (3 एप्रिल) त्यांचं तिकीट कापत बाबूराम कदम कोहळीकर यांना तिकीट देण्याचा निर्णय शिंदेंनी घेतलाय.

हे ही वाचा>> Lok Sabha Election 2024 : शिंदेंनी 2 खासदारांची तिकीट कापली

यावरूनच आता महायुतीत भाजप किती शक्तीशाली आहे हे पाहायला मिळतंय. दरम्यान, यामुळे शिंदेंसोबत गेलेल्या अनेक खासदार आणि नेत्यांची धाकधूक वाढली आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp