Lok Sabha Election 2024 : शिंदेंनी 2 खासदारांची तिकीट कापली

मुंबई तक

ADVERTISEMENT

lok sabha election 2024 eknath shinde cutting the tickey of mp hemant patil bhavana gavali Shinde shiv sena camp maharashtra politics
शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या दोन खासदारांची तिकीट कापली गेली आहेत.
social share
google news

Hemant Patil, Bhavana Gavali : शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या दोन खासदारांची तिकीट कापली गेली आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये शिंदे यांनी हिंगोलीतून बाबूराव कदम (Baburao Kadam) यांना उमेदवारी दिली आहे. तर यवतमाळ वाशिममधून राजश्री पाटील (Rajashree Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन जागांवरून मुख्यमंत्री शिंदे यांनी खासदार हेमंत पाटील आणि खासदार भावना गवळी यांना डच्चू दिला आहे. त्यामुळे या दोन खासदारांना मोठा धक्का बसला आहे.  (lok sabha election 2024 eknath shinde cutting the tickey of mp hemant patil bhavana gavali Shinde shiv sena camp maharashtra politics)

ADVERTISEMENT

हिंगोलीचे आमदार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध होता. भापजने केलेल्या सर्वेत हेमंत पाटील निवडून न येण्याची शक्यता होती. त्यामुळे शिंदे यांना उमेदवार बदलाच्या सुचना मिळाल्या होत्या. हिंगोलीतून मुख्यमंत्री शिंदे यांनी पर्यायी उमेदवार शोधायला सुरूवात केली होती. आणि बाबुराम कदम यांच्या रूपात शिंदेंना उमेदवार देखील मिळाला होता. त्यामुळे हेमंत पाटील यांचा पत्ता कट होणार हे निश्चितच होते. आणि अखेर आज त्याची अधिकृत घोषणा झाली आहे. 

हे ही वाचा : Devendra Fadnavis : ''धोत्रेंच्या पाठीशी महायुती, पवार साहेब सुद्धा...'',

तिकीट कापूनसुद्धा पाटलांच्या घरी उमेदवारी 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरी हिंगोली लोकसभा मतदार संघातून हेमंत पाटील यांचे तिकीट कापले असले तरी त्यांच्या घरात मात्र त्यांनी उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या जागेवर भावना गवळी यांचा पत्ता कट झाला आहे. 

हे वाचलं का?

भावना गवळी या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघातल्या विद्यमान खासदार आहेत. गवळी देखील लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र हेमंत पाटलांची नाराजी ओढवून न घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशिममधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भावना गवळी यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा :  ठाकरेंना कल्याणमध्ये 'ही' चूक महागात पडणार का?

कृपाल तुमानेंचा पत्ता कट 

दरम्यान याधी एकनाथ शिंदे यांचे खासदार कृपाल तुमाने यांचे देखील तिकीट कापलं गेलं होतं. काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर शिंदेंनी रामटेकमधून राजू पारवे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या जागेवर कृपाल तुमानेंचा पत्ता कट झाला आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या तीन खासदारांची तिकीट कापली आहे. या यादीत आणखीन नावे वाढण्याचीही शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT