Govt Job: पंजाब नॅशनल बँकेत 5100 हून अधिक पदे भरली जाणार! पदवीधरांसाठी मोठी संधी...

मुंबई तक

पंजाब नॅशनल बँकेकडून तब्बल 5138 पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 8 फेब्रुवारी 2026 पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. कसा कराल अर्ज? सविस्तर जाणून घ्या.

ADVERTISEMENT

पंजाब नॅशनल बँकेत 5100 हून अधिक पदांसाठी भरती
पंजाब नॅशनल बँकेत 5100 हून अधिक पदांसाठी भरती
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पदवीधरांसाठी सरकारी बँकेत मोठी भरती...

point

पंजाब नॅशनल बँकेत 5100 हून अधिक पदे भरली जाणार!

PNB Recruitment 2026: तुम्हीसुद्धा पदवीधर आहात? आणि सरकारी बँकेतील नोकरीसाठी प्रयत्नशील आहात? तर तुमच्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेकडून तब्बल 5138 पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत, अप्रेन्टिस पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 8 फेब्रुवारी 2026 पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

काय आहे पात्रता?   

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट म्हणजेच पदवीधर असणं आवश्यक आहे. तसेच, उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करतील, त्या राज्यातील स्थानिक भाषा वाचण्यात, लिहिण्यात आणि बोलण्यात उमेदवार प्रवीण असले पाहिजेत. 

वयोमर्यादा   

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2026 तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. याचाच अर्थ उमेदवारांची जन्मतारीख 2 जानेवारी 1998 च्या पूर्वीची आणि 1 जानेवारी 2006 च्या नंतरची नसावी. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. एससी (SC)/एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत10 वर्षांची सूट दिली जाणार आहे. 

हे ही वाचा: गडचिरोली: अबुजमाडच्या जंगलात मोठी चकमक; तीन नक्षलवादी ठार अन् एक जवान शहीद

कसा कराल अर्ज? 

1. या अप्रेंटिसशिपच्या रिक्त पदासाठी फॉर्म भरण्यासाठी, उमेदवारांना सर्वप्रथम pnb.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. 
2. नंतर, Employment Opportunities सेक्शनमध्ये PNB    Apprentice Program 2025-26 च्या लिंकवर जा. 
3. आता विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा. 
6. यानंतर, पासपोर्ट साइज फोटो, सही, जात प्रमाणपत्र, पीडब्ल्यूबीडी प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करा.
7. प्रवर्गानुसार, अर्जाचं शुल्क भरा आणि अर्जाची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp