अभिनेते राजपाल यादव सरेंडर, थेट तिहार जेलमध्ये रवानगी, असं काय घडलं?
Actor rajpal yadav : या प्रकरणात बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या खंडपीठाने राजपाल यादव यांची याचिका फेटाळून लावली होती. या याचिकेत यादव यांनी आत्मसमर्पणासाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, आधी आत्मसमर्पण करणे आवश्यक आहे, त्यानंतरच कोणत्याही अर्जावर विचार केला जाईल. न्यायालयाने याआधीच त्यांना एकदा अतिरिक्त वेळ दिल्याचेही नमूद केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अभिनेते राजपाल यादव सरेंडर
थेट तिहार जेलमध्ये रवानगी, असं काय घडलं?
Actor rajpal yadav : चेक बाऊन्स झाल्याच्या जुन्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव यांनी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या कडक निर्देशांचे पालन करत राजपाल यादव यांनी सायंकाळी सुमारे चार वाजता तिहार तुरुंग प्रशासनासमोर हजर होत सरेंडर केले, अशी माहिती सूत्रांनी दिली. न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणात सुनावलेली शिक्षा भोगण्यासाठी त्यांना तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते.
या प्रकरणात बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या खंडपीठाने राजपाल यादव यांची याचिका फेटाळून लावली होती. या याचिकेत यादव यांनी आत्मसमर्पणासाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, आधी आत्मसमर्पण करणे आवश्यक आहे, त्यानंतरच कोणत्याही अर्जावर विचार केला जाईल. न्यायालयाने याआधीच त्यांना एकदा अतिरिक्त वेळ दिल्याचेही नमूद केले.
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती शर्मा यांनी सांगितले की, मागील वेळी राजपाल यादव यांनी आपण मुंबईत असल्याचे कारण देत वेळ मागितली होती. त्या वेळी न्यायालयाने दोन दिवसांची अतिरिक्त मुदत दिली होती. मात्र त्यानंतरही त्यांनी न्यायालयाच्या आदेशांचे पालन न केल्यामुळे आता कोणतीही सवलत देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. न्यायालयाने हेही स्पष्ट केले की, याचिका आधीच फेटाळण्यात आलेली असून पुन्हा सवलत देण्यास कोणतेही कारण उरलेले नाही.
हेही वाचा : वनऔषधी शोधताना दरीत कोसळले, कमलगिरी महाराजांचा दुर्दैवी अंत; छत्रपती संभाजीनगर हळहळलं










