Pune Lok Sabha election 2024 : वसंत मोरे 'या' पक्षाकडून लढवणार लोकसभा?

मुंबई तक

Vasant More Prakash Ambedkar : माजी नगरसेवक वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करत आहेत. ते वंचित बहुजन आघाडीकडून लढू शकतात.

ADVERTISEMENT

वसंत मोरे हे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी करत आहेत.
वसंत मोरे पक्षात प्रवेश करणार की, पाठिंबा मागणार?
google news

बातम्या हायलाइट

point

महाविकास आघाडीने उमेदवार केला जाहीर

point

महायुतीने मुरलीधर मोहोळांना दिलीये उमेदवारी

point

वसंत मोरे प्रकाश आंबेडकरांना भेटणार

Vasant More Pune Lok Sabha elections 2024 : लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वसंत मोरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला. मनसेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेकडून ऑफरही आल्या. पण, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे वसंत मोरे कोणत्या पक्षाकडून लढणार, असा प्रश्न चर्चिला जात होता. त्यात मोरेंनी घेतलेल्या एका भेटीने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या. मोरेंनी कुणाची भेट घेतली आणि तसा निर्णय झाला तर परिणाम होऊ शकतो?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून वसंत मोरे बाहेर पडले. वसंत मोरे गेल्या काही वर्षांपासून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. पण, पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांमुळे मोरेंनी वेगळी वाट निवडली. मोरे यांना इतर पक्षांकडून ऑफरही आल्या. पण, महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून टाकल्याने त्यांची पंचाईत झाली. 

वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा लढवणार?

लोकसभा लढवण्यास इच्छुक असलेल्या वसंत मोरे यांच्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये संधी राहिलेली नाही. त्यामुळे आता ते काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यात वसंत मोरे यांनी गुरुवारी (२८ मार्च) वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव यांची भेट घेतली. या भेटीने वसंत मोरे वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार 

वसंत मोरे जाधव यांच्यानंतर आज (२९ मार्च) वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार आहेत. वसंत मोरे मुंबईतील आंबेडकर यांच्या राजगृह या निवासस्थानी भेटणार आहेत.

हे वाचलं का?