'तुमची लायकी काय आहे?', संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर नवनीत राणांचा पलटवार! 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Navneet Rana On Sanjay Raut : अमरावतीमध्ये भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण आता यासर्वात चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे संजय राऊतांचं वादग्रस्त विधान... शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांची अमरावतीतल्या सभेत नवनीत राणांवर टीका करताना जीभ घसरली. राऊतांनी राणा यांचा उल्लेख नाची, बबली असा केला होता. यानंतर आता संजय राऊतांच्या या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. (BJP Navneet Rana's slammed Sanjay Raut's after his controversial statement )  

नवनीत राणा नेमकं काय म्हणाल्या? 

'एखादा टिन टप्पर मुंबईवरून उडून येतो आणि अमरावतीच्या सुनेबाबत खालच्या पातळीवर बोलत असेल तर त्याला अमरावतीची जनता सहन करणार नाही.' असं म्हणत नवनीत राणांनी संजय राऊतांवर संताप व्यक्त केला. 

तुमची लायकी काय आहे?- नवनीत राणा

'तुमची लायकी काय आहे? पाच टर्म या ठिकाणी शिवसेनेने अमरावती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं, तुमची लायकी तेवढी राहिली नाही की तुम्ही हा मतदारसंघ मागून या मतदारसंघात उमेदवार देऊ शकले नाही, तेवढीच लायकी तुमची आहे.' अशी जहरी टीका करत नवनीत राणांनी राऊतांवर पलटवार केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नवनीत राणा यांनी यापूर्वीही राऊतांना सुनावले खडेबोल

'तुम्ही तुमच्या पत्नीला, आईला आणि मुलीला विचारा की, तुम्ही कोणता शब्द वापरला आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या बायकोला विचारावे की, तुम्ही काय शब्द बोलला आहात. तुमच्या मुलीचे लग्न झाले, त्यावेळी तीला सासरी पाठवले असेल, तेव्हा त्या मुलीला विचारा तुम्ही कोणता शब्द वापरला आहे. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला, त्या आईला देखील विचारा की तुम्ही काय शब्द वापरला आहे.

या पद्धतीने तुम्ही जर एखाद्या बाई बद्दल घाणेरडे शब्द वापरत असाल. या घाणेरड्या पातळीवर तुम्ही जात असाल तर, तुमची काय लायकी आहे, हे दिसते. यातून तुमची संस्कृती आणि तुमच्यावरील संस्कार सर्व लोकांनी पाहिले असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटांमध्ये जे काही मोजके लोक राहिले आहेत. त्या सर्व उरलेल्या लोकांमध्ये सर्वात बोगस व्यक्ती जर कोणी असेल तर ती संजय राऊत आहे.', अशा कडक शब्दात नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

ADVERTISEMENT

संजय राऊत यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?

'ही लढाई देशाची आहे.. ही लढाई बळवंत वानखेडे आणि ती नाची जी आहे तिच्याशी नाहीए. डान्सरशी नाहीए.. बबलीशी नाहीए.. ही लढाई मोदीविरुद्ध महाराष्ट्र आहे... लक्षात आहे.. ही लढाई मोदीविरुद्ध उद्धव ठाकरे, ही लढाई मोदीविरुद्ध शरद पवार.. ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे.'    'तुम्हाला बाई खुणावेल.. ती पडद्यावरची नटी आहे.. तुम्हाला खुणावेल, तुम्हाला प्रेमाने बोलावेल. पण कोणत्याही मोहाला बळी पडी नका. काय घडलंय पुराणामध्ये, विश्वामित्राचं हरणं झालं. ऋषीमुनी सुद्धा गेले. पण आपण सर्वांनी सावध राहिलं पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत..'    'डोळा मारलं की जायचं नाही.. ते आपलं काम नाही. आता आपला विचार बळवंत वानखेडे हाच आहे.' संजय राऊतांच्या याच विधानामुळे आता अमरावतीत नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT