Aishwarya Abhishek Divorce Rumour : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान अभिषेकने उचललं मोठं पाऊल
Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorce Rumour : अभिषेक सोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना ऐश्वर्या आणि आराध्या न्युयॉर्कला गेल्या होत्या. त्यानंतर दोघीही मायलेकी मायदेशी परतल्यानंतर अभिषेक बच्चन पॅरिस ऑलिम्पिकचे सामने पाहण्यासाठी पॅरिसला गेला होता. विशेष म्हणजे त्याच्यासोबत ना त्याची मुलगी आराध्या बच्चन होती आणि ना ऐश्वर्या बच्चन होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना ऐश्वर्या न्युयॉर्कला होती
त्यानंतर अभिषेक पॅरिस ऑलिम्पिकला गेला होता
अभिषेक बच्चनने मोठं पाऊल उचललं आहे.
Abhishek Bachchan Aishwarya Rai Divorce Rumour : बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर अद्याप अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan ) ऐश्वर्या रायची (Aishwarya Rai) कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. बच्चन कुटुंबियांकडून देखील यावर काहीच प्रतिक्रिया आली नाही आहे. त्यात आता दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सूरू असताना अभिषेक बच्चनने मोठं पाऊल उचललं आहे. (abhishek bachchan shared a video on instagram and turned of comment aishawarya rai bachchan divorce rumour bollywood news)
ADVERTISEMENT
अभिषेक सोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना ऐश्वर्या आणि आराध्या न्युयॉर्कला गेल्या होत्या. त्यानंतर दोघीही मायलेकी मायदेशी परतल्यानंतर अभिषेक बच्चन पॅरिस ऑलिम्पिकचे सामने पाहण्यासाठी पॅरिसला गेला होता. विशेष म्हणजे त्याच्यासोबत ना त्याची मुलगी आराध्या बच्चन होती आणि ना ऐश्वर्या बच्चन होती. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांना आणखीण वाढल्या होत्या.
हे ही वाचा : Ajit Pawar: महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठी बातमी, अजितदादा मुलासाठी बारामती विधानसभा सोडणार?
दरम्यान आता पॅरिस ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर अभिषेकने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर केल्यानंतर त्याने कमेंट सेक्शन ऑफ केले आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून जशा घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत, त्या पाहता चाहत्यांकडून घटस्फोटावर विचारणा होणे साहजिक होते. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी अभिषेक बच्चनने त्याचे कमेंट सेक्शन ऑफ केल्याची माहिती आहे.
हे वाचलं का?
घटस्फोटाची ती पोस्ट?
'घटस्फोट कुणासाठीही सोपा नसतो. आनंदाने जगण्याचे स्वप्न कोण पाहत नाही किंवा रस्ता ओलांडताना एका वृद्ध जोडप्याचा हात धरून तो हृदयस्पर्शी व्हिडिओ पुन्हा बनवायचा आहे? तरीही कधी कधी आयुष्य आपल्या अपेक्षेप्रमाणे नसते,पण अनेक दशके एकत्र घालवल्यानंतर जेव्हा लोक वेगळे होतात, तेव्हा त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग लहान-मोठ्या दोन्ही गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असताना ते कसे सहन करतात? त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल?
अभिषेक बच्चनने ही पोस्ट लाईक केली. ज्यानंतर लोक आता याला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडून पाहत आहेत. आणि त्यानंतर घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : तुमच्या कोणत्या बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार?
दरम्यान 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबंधनात अडकले होते. 2011 मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. आता दोघांच्या लग्नाला 17 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानंतर दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT