Ladki Bahin Yojana : तुमच्या कोणत्या बँकेत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme installment amount deposit on this accout dbt checke by addhar card mukhyamantri ladki bahin yojana scheme
अनेक महिलांच्या खात्यात हे पैसै जमा देखील झाले आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसै पाठवायला सुरूवात

point

अनेक महिलांच्या खात्यात हे पैसै जमा देखील झाले आहेत

point

तुमच्या कोणत्या बँकेत पैसै होतायत जमा

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Scheme : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात बुधवारपासून पैसै पाठवायला सुरूवात केली आहे. आतापर्यंत अनेक महिलांच्या खात्यात हे पैसै जमा देखील झाले आहेत. मात्र ज्या महिलांच्या नावावर एकापेक्षा अधिक बँक खाती (Bank Account) आहेत. त्यांना योजनेचे (Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana)पैसे नेमक्या कोणत्या खात्यात जमा झाले आहेत. याची कल्पनाच नाही आहे. त्यामुळे या महिला संभ्रमाअवस्थेत आहेत. त्यामुळे तुमच्या नेमक्या कोणत्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत? हे जाणून घेऊयात.  (ladki bahin yojana scheme installment amount deposit on this accout dbt checke by addhar card mukhyamantri ladki bahin yojana scheme)
 
राज्य सरकार योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट पैसे हस्तांतर करणार आहे. मात्र एकापेक्षा अधिक बँक अकाऊंट असलेल्या महिलांच्या नेमक्या कोणत्या बँकेत पैसै जमा होणार आहेत? याबाबत त्यांच्यात संभ्रम आहे. मात्र हा संभ्रम आधारकार्ड दुर करणार आहे. तुम्ही तुमच्या आधारकार्डवरून कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहेत. हे तपासू शकता. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Kolkata Crime : कोलकाताच्या अत्याचाराच्या घटनेनंतर 'ती' पोस्ट व्हायरल! सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला नेटकऱ्यांनी सुनावलं

डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसै महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. डीबीटी  प्रणालीद्वारे एकाचवेळी मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करता येते. यासाठी तुमचा आधारकार्ड क्रमांक वापरून तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. यासाठी तुमचे बँक डिटेल्स तपासले जाणार नाहीत. त्यामुळे तुमच्या ज्या बँकेला आधारकार्ड लिंक आहे, त्या खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे तुमचे आधार कार्डशी लिंक असलेले बँक अकाऊंट कसे तपासायचे. हे पाहूयात. 

आधारशी लिंक असलेले बँक अकाऊंट असे तपासा 

  • सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
  • यानंतर तुमचा 12 अंकी आधारकार्ड क्रमांक टाकून लॉग इन करा.
  • आधार क्रमांक भरल्यानंतर आधारशी लिंक असलेल्या तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.
  • आलेला ओटीपी दिलेल्या बॉक्समध्ये भरल्यानंतर तुम्हाला आधारशी संबंधित अनेक पर्याय दिसलीत.
  • नवीन पेजवरील Bank Seeding Status या पर्यायावर क्लिक करा
  • यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि आधारशी लिंक बँकेचे नाव दिसेल. त्याचबरोबर हे खाते सक्रीय आहे की नाही, हे सुद्ध समजेल.तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल. 

आता जर तुम्हाला वरील प्रोसेसवरून तुमचं बँक अकाऊंट कळालं असेल तर त्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 3000 रूपये जमा झाले आहे. जर अजूनही जमा झाले नसतील तर तुमचा अर्ज अजूनही अप्रुव्ह झाला नाही आहे किंवा त्याची छाननी सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Gold Price Today: सोने खरेदीदारांसाठी खुशखबर! आज 1 तोळ्याचा भाव पाहूनच मिळेल दिलासा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT